नवी दिल्ली - बाईक अपघाताच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. यामध्ये काहीवेळा मुलंही बळी पडतात. त्यामुळे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ( Govt's new rules for kids ) मुलांच्या सुरक्षिततेसाठी नियमांमध्ये काही बदल केले आहेत. या नियमाचे ( Two Wheeler Traffic Rules in India ) पालन न केल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल.
नव्या नियमांनुसार, दुचाकी वाहनांवरून मुलांना नेताना आता हेल्मेट सक्तीचं करण्यात आलं आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयानं याबाबत नवी नियमावली जारी केलीये. त्यानुसार 9 महिने ते 4 वर्षांपर्यंतच्या मुलांना दुचाकीवर बसवताना त्यांच्या मापाचं हेल्मेट बंधनकारक असेल. तसेच दुचाकीस्वारांना मुलांसोबत प्रवास करताना दुचाकीचा वेग 40 किमी प्रतितास पेक्षा जास्त नसावा याची खात्री करणे देखील नियमानुसार बंधनकारक आहे.