महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 16, 2022, 5:40 PM IST

ETV Bharat / bharat

Nitin Gadkari in Rajyasabha : देशातील रस्ते 2024 पर्यंत अमेरिकेच्या दर्जाप्रमाणे करणार- नितीन गडकरी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेच्या प्रश्नोत्तराच्या तासात ( Question Hour in the Upper House ) खासदारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. रस्ते सुरक्षेसाठी लोकांमध्ये अधिक जनजागृती करण्याची गरज असल्याचे केंद्रीय मंत्री गडकरी यांनी ( awareness for road safety ) सांगितले. रस्ते पायाभूत सुविधांचा विस्तार हा केवळ प्रश्न नाही.

नितीन गडकरी
नितीन गडकरी

नवी दिल्ली- देशातील रस्त्यांची पायाभूत सुविधा या 2024 पर्यंत अमेरिकेतील दर्जाप्रमाणे करणार ( road infrastructure equivalent to USA ) असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ( Road Transport Minister Nitin Gadkari ) नितीन गडकरी यांनी राज्यसभेत माहिती दिली आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेच्या प्रश्नोत्तराच्या तासात ( Question Hour in the Upper House ) खासदारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. रस्ते सुरक्षेसाठी लोकांमध्ये अधिक जनजागृती करण्याची गरज असल्याचे केंद्रीय मंत्री गडकरी यांनी ( awareness for road safety ) सांगितले. रस्ते पायाभूत सुविधांचा विस्तार ( Nitin Gadkari on road expansion ) हा केवळ प्रश्न नाही. त्याचबरोबर रस्ते अभियांत्रिकी, ऑटोमोबाईल अभियांत्रिकी, लोकांमध्ये जनजागृती आणि शिक्षण या समस्या असल्याचे गडकरींनी सांगितले.

हेही वाचा-Rahul Kanal-Nitesh Rane : राहुल कनाल यांनी पाठवली नितेश राणेंना कायदेशीर नोटीस

रस्त्यांवर वाढलेले अपघात चिंताजनक बाब

भारतामध्ये लोकांना चालकाचा परवाना सहजरित्या मिळत असल्याचे त्यांनी काँग्रेस खासदार एल. हनुमनथैया ( Congress MP L Hanumanthaiah ) यांनी विचारलेल्या प्रश्नावर सांगितले. रस्त्यांवर वाढलेले अपघात ( number of accidents on National Highway ) ही चिंताजनक बाब आहे. त्यावर सरकारकडून योग्य ती उपाययोजना सुरू असल्याचेही केंद्रीय मंत्री गडकरी यांनी सांगितले.

हेही वाचा-Pune School Bouncers Case : पुण्यातील 'त्या' शाळेच्या संचालक व बाउन्सरवर गुन्हा दाखल करा - डॉ. नीलम गोऱ्हे

दरवर्षी रस्ते अपघातात 1.5 लाख लोकांचा मृत्यू

दरवर्षी रस्ते अपघातात 1.5 लाख लोकांचा मृत्यू होतो. ही आकडेवारी युद्धामधील होणाऱ्या मृत्यूहून जास्त आहे. रस्ते अपघात कमी करण्यासाठी अपघातप्रवण क्षेत्र ( black spots of accidents ) पाहिली जातात. तिथे अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या जातात.

हेही वाचा-Children Vaccination Jalgaon : जळगावात बालकांच्या कोविड प्रतिबंधक लसीकरणासाठी लसच मिळाली नाही.. नियोजन बिघडले

ABOUT THE AUTHOR

...view details