महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

लसीकरणाच्या मुद्द्यावरून प्रियंका गांधींनी केंद्राला विचारले तीन प्रश्न - लसींचा तुटवडा

देशात कोरोनाची दुसरी लाट पसरली असून रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. देशातील लोकांसाठी पुरेसा साठा न ठेवता लस निर्यात केल्याप्रकरणी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांनी शनिवारी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.

प्रियंका गांधी
प्रियंका गांधी

By

Published : May 27, 2021, 4:16 PM IST

नवी दिल्ली - देशातील लसीकरणाच्या तुटवड्यावरून विरोधी पक्षाकडून सतत केंद्र सरकारवर हल्ला केला जातोय. विशेषत: लसीकरणाबाबत सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात काँग्रेसने मोर्चा उघडला आहे. लस कमतरतेवरून काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. प्रियंका गांधी यांनी एक व्हिडिओ टि्वट केला असून केंद्र सरकारला तीन प्रश्न विचारले आहेत.

न प्रियंका गांधींनी केंद्राला विचारले तीन प्रश्न...

प्रियंका गांधींनी विचारलेले तीन प्रश्न

1) जगातील सर्वात मोठा लस उत्पादक देशांपैकी एक असलेल्या भारतामध्ये आज लसीची कमतरता का आहे?

२) भारत सरकारने जानेवारी 2021 मध्ये लसीची ऑर्डर का दिली नाही? इतर देशांनी लसींची ऑर्डर 2020 च्या उन्हाळ्यातच दिली होती.

3) भारत सरकारने जानेवारी ते मार्च दरम्यान 6 कोटी लसींची निर्यात का केली? या काळात भारतात फक्त साडेतीन कोटी लोकांना लसी देण्यात आली होती.

देशातील जनतेच्या प्रश्नांची उत्तरे देणे हे सरकारचे कर्तव्य आहे आणि सरकारला या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील, असे प्रियंका गांधी यांनी व्हिडिओमध्ये म्हटलं.

मोदी सरकारने 70 वर्षांच्या प्रयत्नांवर पाणी फेरले -

यापूर्वीही प्रियंका गांधी यांनी देशातील लोकांसाठी पुरेसा साठा न ठेवता लस निर्यात केल्याप्रकरणी केंद्रावर टीका केली होती. भारतामध्ये कोरोनाचा उद्रेक झाला असून लस निर्यात करणारा देश आता लसीची आयात करत आहेत. मोदी सरकारने 70 वर्षांच्या प्रयत्नांवर पाणी फेरले आहे, असे प्रियांका गांधी म्हणाल्या होत्या.

लसींचा तुटवडा -

देशात कोरोनाचा झपाट्याने प्रसार झाला असून रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी देशभरात 16 जानेवरीपासून लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशात ऑक्सफर्ड-अ‌ॅस्त्राझेनेकाच्या 'कोविशिल्ड' आणि भारत बायोटेक कंपनीच्या 'कोव्हॅक्सिन' लसीचे लसीकरण सुरू आहे. देशातील लसींची कमतरता आणि वाढती मागणी यात दिल्ली, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणासह अनेक राज्यांनी लस पुरवठ्यासाठी जागतिक निविदा मागविण्याचे ठरविले आहे

ABOUT THE AUTHOR

...view details