नवी दिल्ली -झाकीर नाईकच्या(Zakir Naik) 'इस्लामिक रिसर्च फाउंडेशन'वर(Islamic Research Foundation) घातलेली बंदी केंद्राने सोमवारी अजून पाच वर्षांसाठी वाढवली आहे. IRF ला बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा, 1967 (1967 चा 37) अंतर्गत 17 नोव्हेंबर 2016 रोजी केंद्र सरकारने प्रथम बेकायदेशीर संस्था म्हणून घोषित केले.
- IRF वरील बंदी पाच वर्षांसाठी वाढवली -
एका अधिसूचनेत, केंद्रीय गृह मंत्रालयाने म्हटले आहे की, IRF देशाच्या सुरक्षेसाठी हानिकारक आहे. देशातील शांतता आणि सांप्रदायिक सलोखा बिघडवण्यासाठी ही संघटना काम करत आहे. त्यामुळे या संघटनेवरील बंदील अजून पाच वर्षासाठी वाढवली जात आहे. तसेच दहशतवादाला खतपाणी देणं आणि धर्मपरिवर्तनाच्या आरोपांमुळे झाकीर नाईक गेल्या काही वर्षांपासून देशाबाहेर आहे. केंद्र सरकारने झाकीर नाईकच्या संस्थेवर बंदी घातली आहे. त्यानंतर झाकीर देशात परतलाच नाही.
- झाकीर नाईकच्या भाषणांवर मलेशियातील अनेक राज्यांमध्ये बंदी -
झाकीर नाईक मागील अनेक वर्षांपासून मलेशियामध्ये राहत आहे. मलेशियामधील अल्पसंख्याक हिंदू आणि चीनी अल्पसंख्याकांबद्दल विवादात्मक वक्तव्य केल्याबद्दल त्याला मलेशिलातील ७ राज्यांनी सार्वजनिक ठिकाणी भाषण करण्यावर बंदी घातली आहे. मेलेका, जोहोर, सेलेनगोर, पेनांन्ग, केडह, पेरील्स, सर्वाक या ७ राज्यांनी झाकीर नाईक यांच्या भाषणावर बंदी घातली आहे.