रुद्रप्रयाग -मागील काही दिवसांपासून कोसळलेल्या मुसळधार पावसानंतर आज हवामान स्वच्छ झाल्याने तीर्थयात्राकरूंना दिलासा मिळाला आहे. केदारनाथ जाण्यासाठी तीर्थयात्राकरू अनेक ठिकाणी अडकून पडले होते. हवामान स्वच्छ होताच भाविक मोठ्या उत्साहाने केदारनाथकडे रवाना झाले. प्रशासनाने बुधवारी सकाळी 12 हजाराहून अधिक तीर्थयात्रा करूंना केदारनाथकडे सोडले. दरम्यान महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनीही केदारनाथांचे दर्शन घेतले. यावेळी रुद्रप्रयाग ते सोनप्रयाग दरम्यान महामार्गावर यात्रेकरूंना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.
हवामान विभागाने जारी केलेल्या हाय अलर्टनंतर तीन दिवस उत्तराखंड राज्यात मुसळधार पाऊस बरसला. पावसामुळे प्रशासनाने केदारनाथ यात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित केली. यामुळे अनेक यात्रेकरून ठिकठिकाणी अडकून पडले. रात्रीच्या वेळी राहण्या व खाण्याची समस्याही भेडसावली. बुधवारी सूर्यदर्शन झाल्याने तीर्थयात्रेकरूंचे चेहरे खुलले व ते पुढच्या यात्रेसाठी रवाना झाले.