देहरादून - राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आपल्या मूळ गावी भेट दिली आहे. यावेळी त्यांनी नामती चेटाबगड येथील प्राथमिक विद्यालयात दौरा केला आणि शाळेच्या परिसरात बसून त्यांनी आपल्या शाळेतील आठवणींना उजाळा दिला. राज्यपालांनी याबाबत आपल्या ट्विटर हैंडल वर काही फोटो पोस्ट केले आहेत. जे सध्या चांगलेच व्हायरल होत आहे. त्यावर नागरिकांच्या प्रतिक्रियाही जोरदार येत आहेत.
कोश्यारी यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना @Sanjay Mathpal नावाच्या यूजरने लिहिले आहे की, भगतदा यांना नमस्कार, हे विद्यालय खरचं पाहण्यासारखे आणि प्रेरणीय स्थळ असून गौरवण्या जोगे आहे. येथून सरकारच्या स्वयंसेवी संस्थांनी कार्य केले तर चांगले वाटेल.
@Highlander नावाच्या एका यूजरनी कोश्यारी यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया देत लिहिले आहे की, तुम्ही आपल्या मनाला आणि बुद्धीला हे पटले नाही का, की मी कुठून कुठे गेलो मात्र माझी शाळा ही आजही त्याच स्थितीत लाटार आहे. मुख्यमंत्री होतात, राज्यसभेत झोपत होतात आणि आता राज्यपाल आहात. आता तर या राजकारणी नाटकातून बाहेर येऊन परिसरासाठी काही करा.