महाराष्ट्र

maharashtra

पंजाबमधील सरकारी शाळांचा लिलाव?; शिरोमणी अकाली दल-'आप'मध्ये खडाजंगी

By

Published : Mar 26, 2022, 3:32 PM IST

पंजाबमधील सरकारी शाळांचा लिलाव (Punjab School Auction Advertisement) सुरू असल्याचा आरोप शिरोमणी अकाली दलचे ज्येष्ठ नेते दलजीत सिंह चीमा (Shiromani Akali Dal Daljit Singh Cheema) यांनी केला आहे. त्यामुळे राज्यात शाळांच्या खासगीकरणाचा मुद्दा तापण्याची शक्यता आहे.

punjab school
पंजाब सरकारी शाळा

चंदीगड - पंजाबमध्ये सध्या आम आदमी पार्टीचे सरकार स्थापन झाले आहे. यानंतर लगेच विविध विषयांवरून विरोधी पक्ष 'आप'वर टीका करताना दिसत आहेत. पंजाबमथील थर्मल कॉलनी येथे एक सरकारी शाळा लिलावला काढल्याची जाहिरात (Punjab School Auction Advertisement) समोर आली होती. याबाबत शिरोमणी अकाली दलचे ज्येष्ठ नेते दलजीत सिंह चीमा (Shiromani Akali Dal Daljit Singh Cheema) यांनी एक ट्विट करत या विषयावरून मुख्यमंत्री भगवंत मान (Punjab CM) यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

पंजाबमधील सरकारी शाळांचा लिलाव : शाळेच्या लिलावाची जाहिरात शक्ती निगमने जारी केली आहे. ही शाळा रोपरमध्ये असून, जाहिरातीतून शाळेचा लिलाव करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. जाहिराती देऊन शाळा विकत घेण्यासाठी इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. ज्यावर शिरोमणी अकाली दलाने आक्षेप घेतला आहे. यावर दलजीत सिंह चीमा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, आपकडून सध्या पंजाबमध्ये दिल्ली मॉडेल सुरू करण्यात आले आहे. आपने पंजाबमधील सरकारी शाळांचा लिलाव करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे हे थांबले पाहिजे. अरविंद केजरीवार आणि मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पंजाबच्या नागरिकांना धोका देणे बंद करावे आणि शाळांचे लिलाव रद्द करावे.

आप आणि शिरोमणी अकाली दल यांच्यात राजकारण : दलजीत सिंह चीमा पुढे म्हणाले की, निवडणुकीपूर्वी आपने पंजाबच्या जनतेला अनेक आश्वासने दिली होती. यात शाळांची सुधारणा करणे हेदेखील आश्वासन होते. मात्र, राज्यात आपची सत्ता आली आणि लगेच सरकारी शाळांचा लिलाव करण्याच जाहिरात काढण्यात आली. पंजाबमधील शाळांचा कायापालट हा दिल्लीतील शाळांसारखा करण्याचे खोटे आश्वासनही आपने दिले होते. मात्र, तसे न करता राज्यातील सरकारी शाळांचे खासगीकरण सुरू असून, ते लगेच थांबले पाहिजे, असे चीमा म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details