वित्त मंत्रालयाने 18 मार्च 2016 रोजी अधिसूचित केलेल्या PPF वरील व्याजाच्या गणनेच्या सूत्रानुसार, PPF व्याज ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत 7.56% पर्यंत वाढू शकते. PPF व्याज दर सरासरी 3-महिन्याच्या G-sec उत्पन्नापेक्षा 25 बेसिस पॉइंट्स जास्त आहे. सध्या, PPF 7.1% व्याज दर देते. सरकार शेवटी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (Provident Fund), सुकन्या समृद्धी बचत योजना,( Sukanya Samriddhi Savings Scheme ) ज्येष्ठ नागरिक बचत योजना (Senior Citizens Savings Scheme), यांसारख्या लहान बचत योजनांवर व्याजदर वाढवू शकते.
PPF Interest Rates : छोट्या गुंतवणूकदारांना खूशखबर; सरकार PPF व इतर लहान बचत योजनांचे व्याजदर वाढवण्याची शक्यता - ज्येष्ठ नागरिक बचत योजना
छोट्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी ( Big news for small investors ) आहे. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (Provident Fund) चे गेल्या नऊ तिमाहींचे स्थिर व्याजदर लवकरच वाढू शकतात.
इतर बचत योजनांवरही लाभ मिळेल -PPF सोबतच, गुंतवणूकदारांना इतर लहान बचत योजनांचे व्याजदर वाढवण्याची भेट मिळू शकते. यामध्ये नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, किसान विकास पत्र (KVP), फिक्स्ड डिपॉझिट, PPF, ज्येष्ठ नागरिक बचत योजना आणि सुकन्या समृद्धी योजनेवरही व्याजदर वाढवले जाऊ शकतात. या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. PPF च्या बाबतीत, व्याजदर सरासरी उत्पन्नापेक्षा 25 बेसिस पॉइंट्स जास्त असू शकतो. जर एका तिमाहीत सरकारी सिक्युरिटीजचे सरासरी उत्पन्न 6.75 टक्के असेल, तर पुढील तिमाहीसाठी पीपीएफचा व्याज दर 25 बेस पॉइंट्स जास्त, म्हणजे 7 टक्के असावा.
उत्पन्नात घट झाली तरी व्याजदर कमी झाला नाही -सिक्युरिटीजचे उत्पन्न आणि PPF व्याजदर यांच्यात थेट संबंध असूनही, उत्पन्न घटले तरीही सरकारने व्याजदरात कपात केली नाही. महामारीच्या काळात जेव्हा सरकारी बाँड्सचे उत्पन्न घटले, तेव्हा सरकारने PPF, NSC आणि इतर लहान बचत योजनांच्या व्याजदरात कपात केली नाही.