महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Ban on putting money in Shaheed Well: जालियनवाला बागेतील शहीद विहिरीत पैसे टाकण्यावर पूर्णपणे बंदी

जालियनवाला बागेला दरवर्षी लाखो पर्यटक या स्थळाला भेट देतात आणि शहीद विहिरीत पैसे टाकतात. सांस्कृतिक मंत्रालयाने यावर बंदी आणली आहे. विहिरीचा वरील भाग बंद करण्याचा आदेश दिला आहे.

शहीद विहिरीत पैसे टाकण्यावर केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाची बंदी
शहीद विहिरीत पैसे टाकण्यावर केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाची बंदी

By

Published : Jul 26, 2022, 2:00 PM IST

चंडीगड: अमृतसर येथील ऐतिहासिक जलियनवाला बागेतील ( Jallianwala Bagh in Amritsar ) शहीद विहिरीत पैसे नाणी टाकण्यावर (putting money in Shaheed Well in Jallianwala Bagh ) पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने (Union Ministry of Culture) घेतला आहे. शहीद विहीरीजवळ यापूर्वी मंत्रालयातर्फे संबंधित सूचनेचे फलक लावण्यात आले होते. तरीही काही पर्यटकांकडून या विहिरीत पैसे टाकणे सुरूच होते.

शहीद स्मारकावर पर्यटकांचे प्रेम - जालियनवाला बागेचे ऐतिहासिक महत्त्व जाणून घेण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक या स्थळाला भेट देतात. यापैकी अनेक पर्यटक शहीदांच्या सन्मानार्थ शहीद स्मारकाच्या विहिरीत पैसे टाकतात. मात्र मंत्रालयाकडून आता यावर पूर्णत: बंदी घालण्यात आली आहे.

शहीद विहिरीतील पैसे ट्रस्टच्या खात्यात - केंद्र शासनाने जीर्णोद्धारासाठी जालियनवाला बागेतील पर्यटन तुर्तास बंद केले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, शासकीय आदेशावरून करण्यात आलेल्या तपासानंतर जालियनवाला बागेतील विहिरीतून 28 जुलैपर्यंत 8.50 लाख रुपये काढण्यात आले. ही रक्कम जालियनवाला बाग मेमोरियल ट्रस्टच्या खात्यात जमा करण्यात आली आहे.

विहिरीचा वरील भाग बंद करण्याचा आदेश - शहीद विहिरीत पैसे टाकले जाऊ नये, अशा आदेशाचा फलक विहिरीजवळ लावण्यात आला असला तरी पर्यटक या विहिरीत पैसे टाकायचे. यावर उपाय म्हणून शासनाने विहिरीचा वरील भाग बंद करण्याचा आदेश दिला आहे.

हेही वाचा - Pregnant Lady demands euthanasia: अश्लील व्हिडिओमुळे गर्भवती महिला त्रस्त, जीवन संपवण्याची केली मागणी

ABOUT THE AUTHOR

...view details