महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Sundar Pichai : गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी घेतली मोदींची भेट - नरेंद्र मोदी

पिचाई (Sundar Pichai) यांनी त्यांच्या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेतली. (Sundar Pichai met Narendra Modi). तसेच त्यांनी दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांच्यासोबत एका कार्यक्रमाला हजेरी लावली.

Sundar Pichai
Sundar Pichai

By

Published : Dec 19, 2022, 10:56 PM IST

नवी दिल्ली : गुगलचे सीईओ सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. (Sundar Pichai met Narendra Modi). आपल्या भेटीची माहिती देताना पिचाई यांनी ट्विट केले की, 'तुमच्या नेतृत्वाखाली तांत्रिक बदलाचा वेग पाहणे प्रेरणादायी आहे. आपली भक्कम भागीदारी सुरू ठेवण्यासाठी आणि सर्वांसाठी काम करणारे खुले, कनेक्टेड इंटरनेट पुढे नेण्यासाठी भारताच्या G20 अध्यक्ष पदाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही उत्सुक आहे.' (Sundar Pichai met Narendra Modi in Delhi).

महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअपसाठी मदत : सुंदर पिचाई यांनी सोमवारी सांगितले की, गुगल 100 हून अधिक भारतीय भाषांसाठी इंटरनेट सर्च मॉडेल विकसित करत असून महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअपसाठी $75 दशलक्षची मदत देणार आहे. भारत दौऱ्यावर आलेले पिचाई यांनी येथे आयोजित 'गुगल फॉर इंडिया' कार्यक्रमाला संबोधित करताना सांगितले की, गुगल भारतातून व्यवसाय करणाऱ्या स्टार्टअप्सवर भर देत आहे. ते म्हणाले की या नवीन कंपन्यांसाठी $300 दशलक्ष राखून ठेवलेल्या रकमेपैकी एक चतुर्थांश रक्कम महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअपमध्ये गुंतवली जाईल. त्यांच्या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. तसेच त्यांनी दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत एका कार्यक्रमाला हजेरी लावली.

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरावर भर : पिचाई यांनी त्यांच्या दौऱ्याच्या सुरुवातीला लिहिलेल्या ब्लॉगमध्ये म्हटले होते की, भारतातील लहान व्यवसाय आणि स्टार्टअपला पाठिंबा देणे आणि सायबर सुरक्षेमध्ये गुगलची गुंतवणूक यासारख्या मुद्द्यांवर पंतप्रधानांशी चर्चा करणार आहे. याशिवाय, शिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षण आणि कृषी आणि आरोग्य सेवा यांसारख्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) च्या वापरासाठी गुगलच्या पुढाकारावर देखील चर्चा केली जाईल. 'गुगल फॉर इंडिया' कार्यक्रमाला संबोधित करताना पिचाई म्हणाले की तंत्रज्ञान जगभरातील लोकांच्या जीवनावर परिणाम करत आहे. अशा वेळी जबाबदार आणि संतुलित नियम करण्याची मागणी होत आहे. ते म्हणाले, भारताकडे असणारे तंत्रज्ञान लक्षात घेता, तुमच्याकडे लोकांसाठी सुरक्षितता आहेत याची खात्री करणे महत्वाचे आहे. ते म्हणाले, तुम्ही एक इनोव्हेशन फ्रेमवर्क तयार करत आहात जेणेकरुन कंपन्या कायदेशीर चौकटीत निश्चितपणे नवनिर्मिती करू शकतील.

1,000 भाषांना ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर आणण्याच्या प्रयत्न : तत्पूर्वी, ते त्यांच्या ब्लॉगमध्ये म्हणाले, 'मी माझ्या 10 वर्षांच्या इंडिया डिजिटायझेशन फंड (IDF) मधून 10 अब्ज डॉलर्सची प्रगती पाहण्यासाठी आणि नवीन मार्ग सामायिक करण्यासाठी येथे आलो आहे. भारताच्या डिजिटल भविष्यासाठी आम्ही मदत करत आहोत. AI वर आधारित एकल, एकात्मिक मॉडेलचा विकास हा आमच्या समर्थनाचा भाग आहे. हे लिखित शब्द आणि आवाजाद्वारे 100 हून अधिक भारतीय भाषा चालवण्यास सक्षम असेल. हे मॉडेल जगातील सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या 1,000 भाषांना ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर आणण्याच्या आमच्या उपक्रमाचा एक भाग आहे. यासह ते म्हणाले की गुगल आयआयटी मद्रासच्या सहकार्याने रिस्पॉन्सिव्ह एआयसाठी नवीन, बहु-अनुशासनात्मक केंद्रास देखील समर्थन देत आहे. AI च्या दिशेने गुगलच्या जागतिक उपक्रमाचा हा एक भाग आहे. पिचाई म्हणाले, 'एआयच्या क्षेत्रात भारत नवीन पावले कशी टाकतो हे पाहण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. याचा फायदा भारतातील एक अब्जाहून अधिक लोकांना होऊ शकतो.

ABOUT THE AUTHOR

...view details