महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Good Health : अशी करा दिवसाची सुरुवात 'जीवन बहुत सुन्दर है' - achieve health life and happiness

तुमची दिवसाची सुरवात (Start Your Morning Well) उर्वरित दिवसभरासाठी तुमची ऊर्जा ठरवत असते. त्यामुळे आपण दिवसाची सुरुवात नेहमी आनंदी आणि सकारात्मक करायला हवी. ती कशी करावी, यासाठी आज आपण 08 सोप्या सवयी (adopt good morning habits) पाहणार आहोत. या सवयी आरोग्य, आयुष्य आणि आनंद (achieve health life and happiness) नक्की मिळेल.Good Health. Life is very beautiful

Good Health
आयुष्य फार सुंदर आहे

By

Published : Oct 12, 2022, 6:23 PM IST

'आपण तेच बनतो, ज्या गोष्टी आपण वारंवार करतो. तेव्हा, उत्कृष्टता ही एक कृती नसून एक सवय आहे.' असे अ‍ॅरिस्टॉटलने सांगितले आहे. तुमची सकाळची सुरुवात (Start Your Morning Well) तुम्ही कशी करता, यावर तुमचे बरेच काही अवलंबुन आहे. तुम्हाला या गोष्टींची जाणीव असो किंवा नसो. मात्र, स्वत:ला चांगल्या सवयी (adopt good morning habits) लावुन घेण्यासाठी जाणीव पुर्वक प्रयत्न करावे लागतात. तेव्हा तुम्ही सकाळच्या चांगल्या 10 सवयीं स्वत:ला लावा व आयुष्यात आरोग्य, आणि आनंद (achieve health life and happiness) मिळवा. Good Health.Life is very beautiful

Good Health

1. सकाळची सुरुवात करा सकारात्मक: आपण सकाळी उठल्या उठल्या स्मार्टफोन बघतो, असे करने अनेकदा कामाचा भाग असु शकतो. मात्र त्यात तासनतास वाया न घालवता. सकाळचा वेळ हा स्वत:ला देणे आवश्यक आहे. तेव्हा सकाळी उठल्या नंतर मोकळ्या हवेत फिरायला जा किंवा व्यायाम, जिम, ईत्यादी पैकी कोणत्याही एका गोष्टीला वेळ द्या. कमीत कमी 10 मिनिटे शांत बसुन मेडीटेशन करा. आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. यामुळे केवळ तुमचे आरोग्यच चांगले राहणार असे नाही तर, तुम्हाला आंतरिक शांती आणि ब्रम्हांडातील एक सकारात्मक ऊर्जा प्राप्त होईल. आणि याचा परिणाम म्हणजे तुमचा संपुर्ण दिवस सकारात्मकतेकडे वाटचाल करेल. तुमच्या दिवसाची सुरुवात निरोगी-आणि ताजेतवानी करण्यासाठी सकाळी सर्वात पहिली गोष्ट करा.

Good Health

2. उठल्यावर प्या कोमट पाणी : सकाळी एक ग्लास पाणी पिणे हे आपल्या शरीराला हायड्रेट करण्याचा एक चांगला मार्ग आहे. एका ग्लास कोमट पाण्यात लिंबू घालण्याचे आयुर्वेदिक तंत्र सांगितले जाते. यामुळे रात्रभर तयार झालेले, पचनसंस्थेतील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत मिळते. सोबतच व्हिटॅमिन सीचा एक चांगला स्रोत यातुन शरिराला मिळतो, वजन कमी करण्यास मदत होते. चयापचय आणि पचनासाठी चांगली मदत होते. आणि मुड फ्रेश राहतो असे सांगितले जाते.

3. जे आहे त्याला धन्यवाद द्या :प्रत्येकाच्या आयुष्यात कमतरता असते. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीलाही कोणत्या ना कोणत्या कमतरतेचा सामना करावा लागतो. त्यामुळे कमतरतांकडे लक्ष देऊ नका. आपल्याकडे काय आहे ते पाहावे आणि त्यासाठी विधात्याचे आभार मानावे. तुम्ही स्वतःसाठी ठरवलेल्या १५ मिनिटांत हे सर्व करू शकता. तुम्ही अंथरुणातून उठण्यापूर्वी, स्वतःला खुश ठेवण्यासाठी तसेच आहे त्याचे चांगले स्मरण करण्यासाठई काही मिनिटे द्या. जेव्हा तुम्ही हसता, तेव्हा ते तुमच्या मेंदूला चांगले न्यूरोट्रांसमीटर (डोपामाइन, एंडोर्फिन आणि सेरोटोनिन) सोडण्यासाठी सिग्नल दिल्या जातात. यामुळे तुमचा मूड चांगला राहतो. शरीर आणि ह्दय आरोग्यदायी राहाते. कृतज्ञता व्यक्त केल्याने तणाव कमी होतो.

Good Health

4.स्वच्छतेच्या सवयी करा :सकाळी आपली कामे उरकतांना घाईघाईत वस्तु इतरत्र कशाही टाकुन देण्याची सवय अनेकांना असते. असे न करता कामे करित असतांनाच प्रत्येक वस्तु निट ठेवणे आणि त्याचबरोबर स्वच्छता ठेवण्याची सवय लावा, असे केल्यास घरात स्वच्छतेबरोबरच प्रसन्नतेचे वातावरण निर्माण होते. जे तुम्हाला दिवसभर प्रसन्न ठेवण्यास महत्वाची भुमिका साकारते. याउलट अस्ताव्यस्त पडलेले घर नकारात्क ऊर्जा आणि आळस निर्माण करते.

5.निट तयार व्हा :आंघोळ करतांना तुमच्या आवडीचा आरोमा- सुगंध असणारं साबण वापरा, असे केल्यास तुमचा मुड आनंदी करणारे हारर्माेन्स सक्रिय होतात. आणि दिवसभर फेश वाटतं. त्यानंतर तुम्ही व्यवस्थित तयार होता. आपल्या आवडीचे ईस्त्री केलेले कपडे घाला आणि गेट अप करा. यामुळे तुम्ही प्रेझेंटेबल दिसता आणि तुमचा आत्मविश्वास वाटतो.

Good Health


6. नाश्ता करणे आवश्यक :
नाश्ता हे दिवसाचे सर्वात महत्वाचे जेवण आहे. सकाळी प्रथिने समृध्द असलेला नाश्ता घ्या. सोबत दुध, फळे आणि एखादा आवडीचा पदार्थ घ्या. जेव्हा तुम्ही हेल्दी नाश्ता करता. तेव्हा तुमच्याकडे दिवसभर काम करण्यास लागणारी ऊर्जा आणि लक्ष केंद्रित करण्याची मजबूत क्षमता तयार होते. शिवाय आरोग्य सर्वांगिण दृष्टया उत्तम राहाते.


Good Health

7.टू-डू ची यादीकरा: तुमची टू-डू ची यादी पुन्हा करा. टू-डू यादी लिहिण्यासाठी काही मिनिटे द्या. तुमच्या प्राधान्य क्रमानुसार ही यादी असु द्या. यामुळे दिवसभरातील कामांचे नियोजन करणे आणि ते हाताळणे सोपे जाईल. तसेच, गोंधळ न उडता सगळी कामे पार पडल्याचा आनंद तुमचा आत्मविश्वास द्विगुणित करण्यास मदत करेल.

8. पुरेशी शांत झोप घ्या :शेवटची सवय तुमच्या सकाळसाठी नाही. तुम्ही नवीन, निरोगी सकाळच्या सवयी लागू करण्याची अपेक्षा ठेवण्यापूर्वी, तुमच्या शरीराचा आणि मनाचा पाया चांगला असावा. तुम्ही जागे असताना तुम्हाला कसे वाटते ते तुमच्या झोपेच्या सवयींवर अवलंबून असते. जर तुम्हाला अस्वस्थ, चिडचिड किंवा थकल्यासारखे वाटत असेल, तर तुम्हाला पुरेशी उत्तम झोप मिळली नाही हे एक कारण असु शकते.

कमी झोपेचे तोटे : झोपेत तुमचे शरीर निरोगी मेंदूच्या कार्यास तसेच तुमचे शारीरिक आरोग्य राखण्यासाठी कार्य करत असते. किंबहुना, झोप ही तुमच्या शारीरिक मानसिक आरोग्यामध्ये, आणि जीवनाच्या गुणवत्तेत महत्त्वाची भूमिका बजावत असते झोपेची कमतरतेचे प्रमाण प्रत्येकानुसार बदलत असते, परंतु याचा अर्थ प्रत्येक रात्री 6 ते 8 तासांपेक्षा कमी शांत झोप तुमच्या आरोग्यावर विपरित परिणाम करु शकते. तुम्ही किती चांगले विचार करता, प्रतिक्रिया देता, काम करता, शिकता आणि इतरांसोबत कसे वागता हे देखील तुमच्या झोपेवर अवलंबुन असते.

नवीन सवयींसह सुरुवात : तुम्हाला पुरेशी दर्जेदार झोप मिळत नसल्याचे तुम्हाला लक्षात येताच झोपेच्या सवयी सुधारण्यासाठी झोपण्यापूर्वी कमप्युटर, मोबाईल आणि गॅझेट्स देखील तुमची झोप अपुर्ण होण्यामागचे महत्वाचे कारण असु शकते. झोपण्यापूर्वी एका व्यक्तीबद्दल आणि तुमच्या आयुष्यातल्या एका संधीबद्दल तुम्ही कृतज्ञ आहात यावर विचार करा. असे केल्यास दुसरा दिवस तुमच्या करिता आणखी नव्या संधी उपलब्ध करुन देणारा ठरेल. जेव्हा तुम्ही रात्रीच्या शांत झोपेनंतर तुमचा दिवस सुरू कराल, तेव्हा तुमच्या सकाळच्या नवीन सवयींसह सुरुवात करून, तुम्हाला पुन्हा मक्कीच आनंदी वाटेल.Good Health. Life is very beautiful

ABOUT THE AUTHOR

...view details