महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

स्मार्ट तस्कर..! पॉवर बँक आणि इलेक्ट्रिक स्विचेसला फिट केले सोन्याचे स्क्रू - कोची विमानतळ सोने तस्करी

केरळमधील कोची विमानतळावर एका चतुर तस्कराला विमानतळ अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून २४ किलो साने ताब्यात घेतले आहे. यातील काही सोने त्याने मोबाईल चार्जिंग करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पॉवर बँकमध्ये लपवून आणले होते.

सोने तस्करी
सोने तस्करी

By

Published : Nov 27, 2020, 3:59 PM IST

कोची - विमानातून सोने, हिरे आणि अमली पदार्थांची तस्करी काही नवीन नाही. प्रत्येक वेळी काहीतरी नवीन शक्कल लढवून महागड्या मालाची आणि वस्तूंची चोरट्या मार्गाने वाहतूक करण्याचा प्रयत्न तस्कर करत असतात. केरळमधील कोची विमानतळावर चतुर तस्कराला अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून २४ किलो साने ताब्यात घेतले आहे. त्याची सोने तस्करी करण्याची पद्धत पाहून मात्र, अधिकाऱ्यांना धक्काच बसला. तस्कराने सोने मोबाईल चार्जिंग करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पॉवर बँकमध्ये लपवून आणले होते.

सोन्याचे स्क्रू

गुप्त माहितीच्या आधारे कारवाई

कोची विमानतळाच्या 'एअर इंन्टेलिजन्स' विभागाने दुबईवरून आलेल्या दोन प्रवाशांना ताब्यात घेतले. गुप्त माहितीच्या आधारे विमानतळाच्या इंन्टेलिजन्स विभागाने कारवाई केली. फ्लाय दुबई फ्लाईटमधून दोन प्रवासी कोची विमानतळावर उतरले असता त्यांना ताब्यात घेतले. कोची विमानतळाने कारवाई केल्यानंतर ट्विटरद्वारे याची माहिती दिली.

पॉवर बँक आणि इलेक्ट्रिकल बटनांना बसवले सोन्याचे स्क्रू

सोन्याची तस्करी करण्यासाठी आरोपींनी अफलातून शक्कल लढवली होती. सुमारे साडेचारशे ग्रॅम सोन्याचे स्क्रू पॉवर बँकला बसविण्यात आले होते. तसेच इलेक्ट्रिकल स्विचेसलाही सोन्याचे स्क्रू फिट करण्यात आले होते. सामानाची तपासणी करताना अधिकाऱ्यांना हे सोने आढळून आले.

ABOUT THE AUTHOR

...view details