हैदराबाद -पाऊस पडत असल्यानेवरील भागातून येणारे पाणी मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरुन वाहत ( Godavari Flood ) आहे. उपनद्यांमधूनही मुसळधार प्रवाह येत आहे. गोदावरीतील भद्राचलम येथे रात्री 11 ( 11 जुलै ) वाजता पाण्याची पातळी 53.9 मीटरवर पोहोचली आहे. तसेच, अधिकाऱ्यांनी आयटीडीए कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. पूरग्रस्त भागातील नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे.
दुम्मुगुडेम येथे प्रवाह 14 लाख क्युसेकपेक्षा जास्त आहे. सिंगूर आणि निजमसागरमध्ये पाच हजार क्युसेकपेक्षा कमी प्रवाह असला तरी, श्री रामसागर, कादेम, एलामपल्ली, मिडमनेरू, कालेश्वरम आणि सुंदिला (पार्वती), अन्नाराम (सरस्वती) आणि मेडिगड्डा (लक्ष्मी) बॅरेजेसमध्ये जोरदार पूर आला आहे. सोमवारी रात्री श्री रामसागर येथून सुमारे 59 हजार क्युसेक, तर इल्लमपल्ली येथून 20 दरवाजे उचलून 93 हजार क्युसेकने विसर्ग नदीत सोडण्यात आला. सुंदिल्ला बॅरेजमधून इल्लमपल्लीचे पाणी सोडण्यात आल्याने आणि मनेरू येथून 45 हजार क्युसेकहून अधिक पुराचा प्रवाह असल्याने अण्णाराम (सरस्वती) बॅरेजचे 60 दरवाजे वाढवून 1.95 लाख क्युसेकने खाली सोडण्यात आले.