महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

गोवा राज्यभर टीका उत्सव घेणार - मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत - टीका उत्सव

गोवा राज्यात १८ ते ४४ वयोगटातील लोकांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण टीका उत्सव ३ राबविण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली आहे. आज (९ जून) ला झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

By

Published : Jun 9, 2021, 7:45 PM IST

पणजी (गोवा) - गोवा राज्यात १८ ते ४४ वयोगटातील लोकांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण टीका उत्सव ३ राबविण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली आहे. आज (९ जून)ला झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, 'आयव्हरमेक्टीन' या गोळ्या खरेदी करण्याचा प्रस्तावही या बैठकीत रद्द केला आहे. या गोळ्यांना सुमारे २२ कोटी रुपये लागणार होते. यावेळी आपल्यात आणि आरोग्य मंत्र्यांत वाद आहे अशी चर्चा आहे. मात्र, या अफवा आहेत. आरोग्य मंत्र्यांत आणि माझ्यात कसलाही वाद नाही. प्रत्येकाचे विचार आणि काम करण्याची पद्धत वेगवेगळी असते. ती आमच्यात आहे. मात्र, आमच्यात चांगला समन्वय असून, आम्ही सरकार चालवताना लोकहिताचा विचार पहिला करत असल्याचेही सावंत यांनी यावेळी सांगितले.

गोवा राज्यभर टीका उत्सव घेणार - मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

'मंत्रिमंडळ बैठकीनंतर केली घोषणा'

टीका उत्सव ३ च्या माध्यमातून आम्ही १८ ते ४४ वयोगटातील राज्यातील प्रत्येकाला लसीकरण करण्याचे नियोजन केले आहे. राज्य सरकारने यापूर्वी दोन टीका उत्सव ग्रामपंचायती आणि नगरपरिषदांमध्ये घेतल्या आहेत. पूर्वी झालेल्या या दोन्ही टीका उत्सवांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे, असा आमचा अनुभव असल्याचे सावंत यावेळी म्हणाले.

'१८ ते ४४ वयोगटातील सर्वाना लसीकरण'

जेव्हा जनतेकडून या टीका उत्सवाला चांगला प्रतिसाद मिळत होता, तेव्हा विरोधी पक्ष या उत्सवावर 'अनावश्यक’ टीका करत होते. मात्र, दोन्ही वेळचा अनुभव पाहता आता आम्ही टीका उत्सव राज्यभर घेणार आहोत. या उत्सवात १८ ते ४४ वयोगटातील सर्वांना लसीकरण करण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले. यावेळी टीका उत्सव ३ च्या तारखा मात्र, जाहीर केल्या नाहीत.

'आयव्हरमेक्टीन गोळ्यांची खरेदी नाहीच'

आयव्हरमेक्टीन गोळ्यांच्या वादाबद्दल बोलताना मुख्यमंत्री सावंत यांनी राज्य सरकारने २२ कोटींच्या गोळ्या खरेदी केल्याची बातमी नाकारली आहे. आयव्हरमेक्टीन गोळ्या कोविड १९ च्या प्रोफेलेक्सिस उपचारांचा एक भाग असावा. त्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे प्रलंबित असल्याने, आम्ही कोणत्याही गोळ्या विकत घेतल्या नसल्याचे ते म्हणाले. सरकारने या गोळ्या विकत घेण्याचा प्रस्ताव रद्द केला आहे. त्यामुळे अभ्यास नसताना काहीजण गैरसमज पसरवत आहेत. असे सांगतानाच 'इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च'ने (आयसीएमआर) मंजूर केले, तेव्हा आयव्हरमेक्टीन गोळ्या होम आयसुलेशन किट्सचा एक भाग होता. आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना संसर्गाच्या उपचारातून आयव्हरमेक्टीन गोळ्यांचा वापर काढून टाकला आहे. त्यामुळे सरकारने या गोळ्या खरेदीचा प्रस्थाव रद्द केला आहे, असेही ते म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details