पणजी गोव्यातून सोनाली फोगाट हत्याकांडासाठी हरियाणा दाखल झालेल्या गोवा पोलिसांच्या पथकाला मृत्यू सोनाली फोगाट हत्याकांडातील महत्त्वाचे पुरावे हाती लागले असून गोवा पोलिसांचा तपास अधिक सुखकर झाला आहे. फोगाड यांच्या महत्त्वाच्या गोष्टींची नोंद केलेल्या 3 डायऱ्या गोवा पोलिसांनी जप्त केल्या असून यातूनच पुढील तपासाची दिशा ठरणार आहे. Bjp Leader Sonali Phogat Murder Case हरियाणाच्या हिसार जिल्ह्यातील दिवंगत सोनाली फोगटच्या संत नगर येथील निवासस्थानी शुक्रवारी भेट दिलेल्या गोवा पोलिसांच्या पथकाने सांगितले की त्यांच्याकडे तीन जुन्या डायरी सापडल्या आहेत.
सोनाली फोगाट हत्याकांडात गोवा पोलीस आपल्याला सहकार्य करत नाहीत. या हत्याकांडात आरोपी असणाऱ्या व्यक्तींना गोवा पोलीस पाठिशी घालण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही त्यांच्याशी सहकार्याची भूमिका मागितल्यास ते आम्हाला सहकार्य करत नाही, असा दावा हरियाणाच्या एका पोलीस अधिकाऱ्याने केला आहे.
पोलिसांच्या हाती लागले सबळ पुरावे -गोव्यात घडलेल्या भाजप नेत्या व अभिनेत्री सोनाली फोगाट Bjp Leader Sonali Phogat Murder Case हत्याकांडाचा तपास करण्यासाठी गोवा पोलिसांचे Goa Police Investigation In Haryana एक पथक मागच्या दोन दिवसांपूर्वी हरियाणा येथे दाखल झाले होते. त्यांनी तेथे जाऊन मृत सोनाली फोगाट Bjp Leader Sonali Phogat Murder Case यांच्या मृत्यूविषयी योग्य ते पुरावे जमा केले आहेत. फोगाट यांच्या मृत्यूप्रकरणी गोवा पोलिसांनी Goa Police Arrested 5 Accused In Sonali Phogat Murder Case आधीच पाच आरोपींना जेरबंद केले होते. या प्रकरणाचा अधिक तपास हरियाणात योग्य दिशेने सुरू असल्याची माहिती उत्तर गोवा पोलीस अधीक्षक शोबित सक्सेना Shobhit Saxena, Superintendent of Police Goa यांनी दिली आहे.