नवी दिल्ली - गोवा पोलिसांनी काल सोनाली फोगटच्या मोबाईलसह दागिने, पासपोर्ट गुरुग्राम फ्लॅटमधून जप्त केले आहे. गोवा पोलिसांची ही कारवाई केली. सोनाली फोगटचा पासपोर्ट, Goa Police seized Sonali Phogat passport दागिने, घड्याळे, 16,000 रुपयांची रोकड सोनालीच्या गुरुग्राम फ्लॅटमधून पोलिसांना मिळाली आहे. भाजप नेत्या सोनाली फोगटच्या मृत्यूप्रकरणी हिसारहून गोवा पोलीस रोहतकनंतर रविवारी सकाळी गुरुग्रामच्या ग्रीन सोसायटीच्या फ्लॅट क्रमांक 901 वर पोहोचले. सुमारे 5 तास टीम फ्लॅटमध्ये होती. यावेळी टीमसोबत सोनालीचे कुटुंबीयही उपस्थित होते. तेथून काही महत्त्वाची माहिती टीमला मिळाली आहे.
कुटुंबीयांच्या जीवाला धोका -चौकशी पथकाने सोनाली फोगट यांच्या फार्म हाऊसवर राहणाऱ्या मुलगी यशोधरा हिने सांगितले की, माझ्यासह माझ्या कुटुंबीयांच्या जीवाला धोका आहे. आम्हाला सुरक्षा पुरविण्यात यावी. या प्रकणी लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांची बैठक घेण्याची मागणी देखील त्यांनी केली. मिळालेल्या माहितीनुसार, सोनाली हत्या प्रकरणाच्या तपासासाठी गोवा पोलिसांचे दोन सदस्यीय पथक हिसार येथे पोहोचले होते. हिसारमध्ये 4 दिवस तपास केल्यानंतर रविवारी सकाळी टीम सोनालीचा पीए आरोपी सुधीर सागवान याच्या रोहतकच्या घरी पोहोचली. सुमारे दीड तास चौकशी केल्यानंतर ते गुरुग्रामला रवाना झाले. येथे सुधीर सागवान यांनी भाड्याने फ्लॅट घेतला होता. फ्लॅटच्या तपासावेळी सोनालीचा भाऊ रिंकू पवार, मेहुणा अमन पुनिया आदी पथकासह उपस्थित होते.