पणजी भाजपा नेत्या सोनाली फोगाट मृत्यूबाबत Sonali Phogat Case PM report शवविच्छेदन अहवालात त्यांच्या शरीरावर जखमा आढळल्याची माहिती गुरुवारी पुढे आली होती. या संदर्भातील माहिती गोवा मेडिकल कॉलेजचे डीन शिवानंद बांदेकर यांनी दिली होती. त्यानंतर सोनालीच्या मृत्यूबाबत पोलिसांनी योग्य तपास करण्याची मागणी तिच्या कुटुंबाने केली गुरुवारी केली होती. आता या प्रकरणाला गोवा पोलिसांनी दिलेल्या स्पष्टकरणामुळे नवे ट्विस्ट मिळाले आहे.
Goa Police On Sonali Phogats case today सोनाली फोगाट यांच्या शरीरावरील जखमा खोलवर नाहीत, गोवा पोलिसांचे स्पष्टीकरण - sonali Phogat
भाजपा नेत्या सोनाली फोगटच्या शरीरावर धारदार जखमा आढळल्या नाहीत, असे गोवा पोलिसांनी स्पष्ट केले आहे. सोनाली फोगाट यांच्या शवविच्छेदन अहवालात Sonali Phogat Case PM report त्यांच्या शरीरावर जखमा आढळून आल्या होत्या. त्यामुळे सोनाली यांच्या मृत्यूबाबत पोलिसांनी योग दिशेने तपास करावा अशी मागणी त्यांच्या कुटुंबियांनी केली होती.
भाजप नेत्या सोनाली फोगाट यांच्या गोव्यामध्ये झालेल्या मृत्यूमुळे एकच खळबळ उडाली होती. त्यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर वेगवेगळ्या शंका उपस्थित केल्या जात होत्या. शवविच्छेदन अहवालात त्यांच्या शरीरावर जखमा आढळ्यानंतर कुटुंबियांनी सोनाली फोगाट यांच्यावर बलात्कार करून खून करण्यात आल्याचा आरोप sonali Phogat rape murder allegation त्यांचे सहकारी सुधीर सागवांन आणि सुखविंदर यांच्यावर केला होता. तसेच त्यांनी याविषयीची तक्रार बुधवारी अंजुना पोलीस स्थानकात Anjuna Police Station देखील केली होती. यावेळी त्यांनी या दोन्ही संशयितांविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली होती Sonali Phogat murder case . गोवा पोलिसांनी आता या प्रकरणात नवी माहिती दिली आहे. सोनाली फोगटच्या शरीरावर धारदार जखमा आढळल्या नाहीत, असे गोवा पोलिसांनी स्पष्ट केले आहे.