गोवा (पणजी) - बनावट ओळखपत्राच्या आधारे ताज हॉटेलमध्ये ( Goa police arrest two NCP office bearers ) वास्तव्य करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन पदाधिकाऱ्यांना गोवा पोलिसांनी अटक ( NCP office bearers arrest goa ) केली आहे. याच हॉटेलमध्ये शिवसेनेच्या बंडखोर आमदार वास्तव्यास होते.हे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी गेल्या दोन दिवसांपासून हॉटेल ताज कन्वेन्शन सेंटरमध्ये वास्तव्य करत होते. सोनिया दोहन ( Sonia Dohan arrested goa police ) आणि श्रेय कोटीहाल अशी या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची नावे आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
हॉटेलमध्ये तोतयागिरी करून तपासणी केल्याचा संशय- महाराष्ट्राचे आमदार तळ ठोकून होते त्या डोना पॉला येथील हॉटेलमध्ये तोतयागिरी करून तपासणी केल्याच्या संशयावरून गोवा पोलिसांनी शनिवारी दोघांना अटक केली. पणजी पोलीस निरीक्षक सूरज गवस यांनी सांगितले की, हरियाणातील एक आणि उत्तराखंडमधील दोन जणांना तोतयागिरी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यांनी सांगितले की ते डोना पॉला येथील तारांकित हॉटेलमध्ये एक दिवस राहत होते. योगायोगाने हे तेच हॉटेल आहे जेथे महाराष्ट्राचे आमदार तळ ठोकून होते. परंतु, दोन्ही घटनांचा संबंध आहे की नाही? हे तपासात उघड होईल, असे गवस म्हणाले. पोलीस सूत्रांनी सांगितले की, दोघेही रिसॉर्टमध्ये तोतयागिरी करत असल्याचा संशय आल्याने त्यांना अटक करण्यात आले. 29 जूनपासून शिवसेनेच्या बंडखोर आमदारांसह इतर अपक्षांनी तेथे चेकइन केल्याने गोवा पोलिसांनी रिसॉर्टमध्ये कडक बंदोबस्त ठेवला होता. गुवाहाटीहून हा ग्रुप रिसॉर्टमध्ये आला होता.