पणजी (गोवा) - गोवा सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज पासून सुरूवात होत आहे. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना गोव्याचे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी सांगितले आहे की, सरकारने मागील अंदाजपत्रकात जाहीर केलेल्या योजना लागू केले की नाही, हे कृती आराखडा अहवालाद्वारे सभागृहात ठेवणे आवश्यक आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ते माध्यमांशी बोलत होते.
सरकारने मागील अंदाजपत्रकाचा आढावा ठेवणे आवश्यक- दिगंबर कामत
सरकारने अर्थसंकल्प सादर करताना मागील कृती आराखडा समोर ठेवणे आवश्यक आहे. तत्कालीन अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर करताना मागील वर्षाच्या अंमलबजावणीचा आढावा सभागृहात ठेवला होता. तशीच प्रथा जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हा गोव्यात सुरू केली होती, असेही यावेळी कामत म्हणाले.
कामत म्हणाले की, मागील वर्षाच्या योजना लागू झाल्या की नाही हे समजण्यासाठी सरकारने श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी आम्ही वारंवार करत आहोत. जर सरकारने अशी पत्रिका प्रकाशित केली असती तर गोमंतकीय जनतेला राज्याच्या आर्थिक स्थितीचा अंदाज आला असता. यासाठी सरकारने अर्थसंकल्प सादर करताना मागील कृती आराखडा समोर ठेवणे आवश्यक आहे. तत्कालीन अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर करताना मागील वर्षाच्या अंमलबजावणीचा आढावा सभागृहात ठेवला होता. तशीच प्रथा जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हा गोव्यात सुरू केली होती, असेही यावेळी कामत यांनी म्हणाले. तसेच पुढे बोलतांना कामत यांनी सांगीतले की, योजना लागू झाली की नाही हे समजण्यासाठी श्वेतपत्रिका आवश्यक आहे. जर योजनेची अंमलबजावणी होत नसेल तर घोषणा करण्यात काय अर्थ आहे. केवळ लोकांना दाखविण्यासाठी घोषणा नकोत.असे म्हणत त्यांनी यावेळी सरकारवर निशाणा साधला.
हेही वाचा-टीआरपी घोटाळा : अर्णबला अटक करण्यापूर्वी ३ दिवस आधी नोटीस द्या - उच्च न्यायालय