पणजी (गोवा) - कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने अपक्ष आमदार रोहन खंवटे यांनी बुधवारी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना पत्र लिहून पर्वरी येथील बहुउद्देशीय चक्रीवादळ निवारा व अग्निशमन केंद्रांचा कोविड केअर सेंटर म्हणून वापर करण्याचे आवाहन केले आहे. तर यावेळी त्यांनी गोवा सरकारवर कोरोना रोखण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला आहे.
कोरोना रोखण्यात गोवा सरकार अपयशी, गोव्यातील अपक्ष आमदाराचा आरोप
कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने अपक्ष आमदार रोहन खंवटे यांनी बुधवारी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना पत्र लिहून पर्वरी येथील बहुउद्देशीय चक्रीवादळ निवारा व अग्निशमन केंद्रांचा कोविड केअर सेंटर म्हणून वापर करण्याचे आवाहन केले आहे. तर यावेळी त्यांनी गोवा सरकारवर कोरोना रोखण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला आहे.
तौक्ते चक्रीवादळात आम्ही अत्यंत वाईट अनुभव घेतला -
पर्वरी येथील बहुउद्देशीय चक्रीवादळ निवारा केंद्र पूर्ण आहे. मात्र अग्निशमन केंद्र प्राधान्याने पूर्ण करावे आणि याठिकाणी कोविड केअर सेंटर उभारण्यात यावे. तर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी या ठिकाणी कोविड केअर सेंटर उभारल्यास ते मदतगार ठरेल, असेही आमदार रोहन खंवटे यावेळी म्हणाले. पर्वरी येथे अग्निशमन केंद्र सर्व पायाभूत सुविधा, वाहने व यंत्रसामग्रीसह लवकरात लवकर सुरू करणे आवश्यक आहे. तौक्ते चक्रीवादळात आम्ही अत्यंत वाईट अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे आपत्तीच्या काळात नैसर्गिक आपत्तीशी सामना करण्यासाठी ही केंद्रे किती फायदेशीर आहेत, हे प्रकर्षाने समोर आले आहे. हे घेतले पाहिजे असेही ते यावेळी म्हणाले.