महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कोर्टानं फटकारल्यामुळे मुख्यमंत्री निराश - आमदार विजय सरदेसाई - मुख्यमंत्री प्रमोद सावंत

विरोधी पक्ष गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी सरदेसाई यांना बेकार म्हटलं होतं. त्यावरून निशाणा साधत लॉकडाऊनमुळेच मी घरी असल्याचं मुख्यमंत्र्यांना म्हटलंय.

आमदार विजय सरदेसाई
आमदार विजय सरदेसाई

By

Published : May 27, 2021, 12:16 PM IST

पणजी (गोवा) - कोविड काळातील गोवा सरकारचे मिसमॅनेजमेंट आम्ही लोकांसमोर आणले म्हणून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत फ्रस्टेशनमध्ये आलेत आणि त्यातून मला त्यांनी बेकार म्हटले आहे. यामधून मुख्यमंत्री सावंत यांची संस्कृती दिसून येते, असा पलटवार विरोधी पक्ष गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी केला आहे. मुख्यमंत्री सावंत यांनी त्यांच्यावर बेकार असल्याची टीका केली होती.

कोर्टाने फटकारल्याने मुख्यमंत्री निराश झाले आहेत -

आमदार विजय सरदेसाई पुढे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी मला बेकार म्हटले. खरंतर कोरोनाच्या या काळात कर्फ्यू लागू असून सरकारच प्रत्येकाने घरात रहावे म्हणून सांगते. घरात राहणे म्हणजे बेकार आहे असे होते का? मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत फ्रस्टेशनमध्ये आले आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांमधून कोविड काळातील गोवा सरकारचे मिसमॅनेजमेंट लोकांसमोर आले आहे. त्यात कोर्टानेही सरकारला फटकारले आहे. त्यातून त्यांचे फ्रस्टेशन आणखीन वाढले आहे. विरोधी आमदार तुम्हाला प्रश्न विचारतो म्हणून आपण त्याला बेकार म्हणत असाल तर तुमचीच संस्कृती त्यातून दिसून येते, असेही विजय सरदेसाई यावेळी म्हणाले.

आमदार विजय सरदेसाई यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर टीका केली..

सरकार कोण चालवतं हे मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्यांना सांगावे -

आमचे सल्ले तुम्ही स्वीकारता आणि दुसऱ्या बाजूला आम्हाला तुम्ही बेकार म्हणता हे कसं काय ? हा प्रश्नदेखील त्यांनी यावेळी विचारला. मी घरात आहे म्हणून तुम्ही मला बेकार म्हणता हे मी मान्य करतो. मात्र तुम्हीच कामात आहात. मुख्यमंत्री म्हणतात, की ते सरकार चालवतात. मात्र सरकार कोण चालवतंय हे त्यांनी त्यांच्या मंत्र्यांना सांगावे. आपत्ती व्यवस्थापन पूर्णपणे कोलमडले असल्याचे अनेक मंत्री आपल्याला सांगतात, असेही विजय सरदेसाई यावेळी म्हणाले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काय म्हटले होते ?

गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांना काम नसल्याने त्यांच्याकडून आरोपबाजी केली जात आहे. खरे गोंयकारपण काय असते ते आपण त्यांना दाखवले आहे. आपण सरकार चालवतो त्यामुळे सर्व गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागतो. गोवा भारतातच असल्याने केंद्राची मार्गदर्शक तत्त्वे आम्हाला पाळावीच लागतील. त्यांच्या मतानुसार संपूर्ण लॉकडाऊन केला असते तर जीवनावश्यक वस्तू येणेही थांबले असते. त्याचा मोठा परिणाम गोमंतकीयांवर झाला असता. वाहतूक रोखली असती तर परराज्यांतून ये-जा करणारे औषध कंपन्यांचे सुमारे ५ हजार कामगार कसे आले असते? राज्यातील औषध कंपन्या बंद पडल्या असत्या. मी गोव्याच्या हितासाठीच काम करीत आहे. मुख्यमंत्री म्हणून मला सर्वच गोष्टींचा विचार करावा लागतो, असेही मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details