Goa Election : आज थंडावनर प्रचारतोफा - Goa Election
गोवा विधानसभा निवडणुकीच्या (goa assembly elections ) प्रचारतोफ आज संध्याकाळी 6 वाजता थंडावनर (The campaign will stop today) आहेत. सोमवारी 14 फेब्रुवारी ला विधानसभेच्या 40 जागांसाठी मतदान होत आहे. शुक्रवारी सर्वच राजकीय पक्ष राजकीय धुरळा उडवित मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत.
पणजी: पणजी-गोवा विधानसभा निवडणुकीच्या (goa assembly elections ) प्रचारतोफ आज संध्याकाळी 6 वाजता थंडावनर (The campaign will stop today) आहेत. सोमवारी 14 फेब्रुवारी ला विधानसभेच्या 40 जागांसाठी मतदान होत आहे. शुक्रवारी उशिरापर्यंत सर्वच राजकीय पक्षांनी राजकीय धुरळा उडवित मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला.
इतिहासात प्रथमच 10 पक्ष रिंगणात
यंदाच्या निवडणुकीत प्रथमच 10 पक्ष आपले नशीब अजमावून पाहणार आहेत.; भाजप, काँग्रेस, आप, गोवा फॉरवर्ड, तृणमूल काँग्रेस, महाराष्ट्र वादी गोमंतक पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, रिव्हॉलूषणारी गोवन, संभाजी ब्रिगेड या राजकीय पक्षाचे उमेदवार रिंगणात आहेत.
एकूण 301 उमेदवार रिंगणात
भाजपने प्रथमच सर्व 40 जागा लढवल्या आहेत आहेत. रिव्हॉलूषणारी गोवन पक्ष ही सर्व जागांवर निवडणूक लढवीत आहे. काँग्रेस ने 37 जागांवर उभे केले असून युतीत असणाऱ्या गोवा फॉरवर्ड ला 3 जागा देण्यात आल्या आहेत. आप 39, तृणमूल 26, मगोप 13, राष्ट्रवादी 12, शिवसेना 10 तर संभाजी ब्रिगेड 3 जागा लढवीत आहेत. 40 जागांसाठी 9 पक्ष आणि अपक्ष असे 301 उमेदवार रिंगणात आहेत.
दिग्गज नेत्यांनी केला प्रचार
यंदा प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, गृहमंत्री अमित शाह, राजनाथ सिंह, स्मृती इराणी, ममता बॅनर्जी, काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, आदित्य ठाकरे प्रचारात सहभागी झाले होते.
यांनी सांभाळली प्रचाराची धुरा
भाजपने निवडणुकीची जबाबदारी महाराष्ट्र राज्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोपविली असून त्यांच्या सोबतीला केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी, दर्शना जरदोष हे सहप्रभारी होते. काँग्रेस ने ज्येष्ठ नेते पी चिदम्बरम आणि दिनेश गुंडू राव तर तृणमूल च्या वतीने प्रभारी पदाची जबाबदारी खासदार महुआ मोईतरा यांच्यावर टाकण्यात आली आहे. आम आदमी पक्षाची प्रचाराची सूत्रे स्वतः अरविंद केजरीवाल यांच्या हाती आहेत .