महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Churchill Alemao : तृनमूलचे चर्चिल अलेमाव बेनौलिम (बाणावली) मतदारसंघातून पराभूत

गोवा विधानसभेत 40 जागांसाठी 301 उमेदवार रिंगणात उतरले होते. या निवडणुकीचा निकाल आज लागला. तृनमूलचे चर्चिल अलेमाव बेनौलिम (बाणावली) मतदारसंघातून पराभूत झाले आहेत.

Goa Election Trinamool Churchill Alemao
गोवा निडणूक निकाल चर्चिल अलेमाव

By

Published : Mar 9, 2022, 5:28 PM IST

Updated : Mar 10, 2022, 4:26 PM IST

पणजी (गोवा) -गोवा विधानसभेत 40 जागांसाठी 301 उमेदवार रिंगणात उतरले होते. या निवडणुकीचा निकाल आज लागला. तृनमूलचे चर्चिल अलेमाव बेनौलिम (बाणावली) मतदारसंघातून पराभूत झाले आहेत.

माजी खासदार चर्चिल अलेमाव यांची कारकीर्द

गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि 14 व्या लोकसभेतील माजी खासदार चर्चिल अलेमाव (Churchill Alemao) यांनी 38 जणांसह तृणमूल काँग्रेसमधे प्रवेश करताना संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच तृनमूलमध्ये विसरर्जित केला होता. आलेमाव यांनी तृनमूलच्या झेंड्याखाली बेनौलिम (बाणावली) मतदारसंघातून नशीब आजमावले. आज निवडणुकीच्या निकालात चर्चिल यांचा पराभव झाला आहे. या निकलामुळे तृणमूलला नक्कीच झटका बसला असेल.

गोव्यातील विधानसभा निवडणुकीचा ( Goa Election Result Date ) निकाल १० मार्चला लागला. ४० जागांसाठी झालेल्या या मतदान प्रक्रियेत ३०१ उमेदवारांनी भाग्य अजमावले. 78.94 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत आपला कौल दिला आहे.

हेही वाचा -Goa Election 2022 : मायकल लोबो : सर्वात श्रीमंत उमेदवार.. गोव्यात सत्तास्थापनेत बजावणार महत्वाची भूमिका..?

अलेमाव यांची कारकीर्द

चर्चिल अलेमाव यांचा जन्म 16 मे 1949 रोजी झाला. ते भारताच्या 14 व्या लोकसभेचे माजी खासदार तसेच, गोव्याचे माजी मुख्यमंत्री राहिले आहेत. सध्या ते बेनौलीम (बाणावली) मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. अलेमाओ ( Goa Election Result Churchill Alemao ) हे 1990 च्या दशकाच्या सुरुवातीस काही काळ गोव्याचे मुख्यमंत्री होते. नंतर 1996 ते 1998 पर्यंत दक्षिण गोव्याचे प्रतिनिधित्व करणारे खासदार बनले. आलेमाव यांनी युनायटेड गोअन्स डेमोक्रॅटिक पार्टीचीही स्थापना केली होती.

18 दिवसांसाठी मुख्यमंत्री राहिले, मात्र या करणाने राजीनामा द्यावा लागला

1980 च्या दशकाच्या उत्तरार्धात, आलेमाव यांनी युनायटेड गोअन्स डेमोक्रॅटिक पार्टी सोडली आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झाले. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील प्रोग्रेसिव्ह डेमोक्रॅटिक फ्रंटचा भाग म्हणून ते 18 दिवसांसाठी मुख्यमंत्री झाले. पक्षातील अंतर्गत फुटीमुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर लुईस प्रोटो बारबोसा मुख्यमंत्री झाले. नंतर अलेमाव काँग्रेसचे नेते म्हणून खासदार झाले. मार्च 2007 मध्ये, अलेमाव यांनी काँग्रेस सोडली आणि सेव्ह गोवा फ्रंट या प्रादेशिक पक्षाची स्थापना केली. सेव्ह गोवा फ्रंट या पक्षाने 17 जागा लढवल्या आणि 2 जिंकल्या, त्यात त्यांची जागा आणि अलेक्सो लॉरेन्को यांचा समावेश आहे.

..या कारणाने काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीत सामील झाले

निवडणुकीनंतर कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही आणि सेव्ह गोवा आघाडीने सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीत सामील झाले. जानेवारी 2008 मध्ये अलेमाव यांनी गोवा वाचवा आघाडीचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण केले. या काळात ते गोव्यात आमदार आणि मंत्री राहिले.

परभवासाठी यांना धरले जबाबदार

मार्च 2012 च्या गोव्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत, अलेमाओ यांचा अपक्ष उमेदवार अवेर्तनो फुर्ताडो यांच्याकडून 2000 पेक्षा जास्त मतांच्या फरकाने पराभव झाला. गोवा सरकारमध्ये मंत्री असलेले त्यांचे भाऊ जोआकियम अलेमाव यांचाही पराभव झाला कारण त्यांना त्यांचा कनकोलिम मतदारसंघ राखता आला नाही. चर्चिल आलेमाओ यांची मुलगी वलंका आणि जोआकिम, तसेच मुलगा युरी यांचाही 2012 च्या निवडणुकीत पराभव झाला. अलेमाव कुटुंबातील चारही उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले. चर्चिल आलेमाओ यांनी नंतर आपल्या पराभवासाठी गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री दिगंबर कामत आणि इव्हिएमला जबाबदार धरले.

म्हणून स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याची घोषणा

2014 मध्ये, दक्षिण गोव्यातून 16 व्या लोकसभेच्या निवडणुकीत त्यांची मुलगी वलंका अलेमाव हिला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतर, त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा राजीनामा दिला आणि स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याची घोषणा केली. दोन दिवसांनंतर, ते अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झाले आणि पश्चिम बंगाल सरकारमधील राज्यमंत्री मदन मित्रा यांनी त्यांना औपचारिकपणे पक्षात घेतले. त्यांनी अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसचे उमेदवार म्हणून दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातून 16 व्या लोकसभेची निवडणूक लढवली आणि भारतीय जनता पक्षाच्या नरेंद्र केशव सवाईकर यांनी त्यांचा पराभव केला.

'हा' फुटबॉल संघ मालकीचा

17 ऑक्टोबर 2016 रोजी आलेमाव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला आणि राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याचा इरादा जाहीर केला. 2017 च्या गोवा विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी बेनौलिम जागा जिंकली होती. अलेमाओ यांनी 13 डिसेंबर 2021 रोजी पुन्हा ऑल इंडिया तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. चर्चिल ब्रदर्स हा फुटबॉल संघ त्यांच्या कुटुंबाच्या मालकीचा आहे. त्यांची मुलगी वलंका आलेमाओ ही क्लबची सध्याची सीईओ आहे.

हेही वाचा -Goa Election 2022 : पणजीत उत्पल पर्रीकरांमुळे भाजपाची प्रतिष्ठा लागली पणाला..

Last Updated : Mar 10, 2022, 4:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details