महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कोकणी ही गोव्याची राज्यभाषा, मराठीची बोलीभाषा नाही - मुख्यमंत्री प्रमोद सावंत - konkani is official language of goa

इतर भाषांप्रमाणे कोकणीला ही आपलं स्वतंत्र अस्तित्व असून ती गोव्याची राजभाषा आहे. आम्हाला आमच्या कोकणीचा अभिमान आहे. महाराष्ट्रातील रायगडपासून केरळ पर्यंत विविध अंगाने कोकणी भाषा बोलली जाते. गोव्यासाठी कोकणी आमचा अभिमान स्वाभिमान सर्वकाही आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले

goa cm pramod sawant say konkani is official language of goa and not spoken language of marathi
मुख्यमंत्री प्रमोद सावंत

By

Published : May 14, 2022, 10:35 PM IST

Updated : May 14, 2022, 10:48 PM IST

सिंधुदुर्ग/पणजी - कोकणी ही एक स्वतंत्र भाषा असून तिला इतर भाषेप्रमाणे स्वतंत्र स्थान आहे. त्यामुळे कोकणीला कोणीही मराठीची बोली भाषा म्हणू नये असे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अखिल भारतीय कोकणी परिषदेत बोलताना सांगितले. कोकणी परिषदेचे आयोजन महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

कोकणी ही गोव्याची राज्यभाषा, मराठीची बोलीभाषा नाही
कोकणी आमचा अभिमान स्वाभिमान सर्वकाही -इतर भाषांप्रमाणे कोकणीला ही आपलं स्वतंत्र अस्तित्व असून ती गोव्याची राजभाषा आहे. आम्हाला आमच्या कोकणीचा अभिमान आहे. महाराष्ट्रातील रायगडपासून केरळ पर्यंत विविध अंगाने कोकणी भाषा बोलली जाते. गोव्यासाठी कोकणी आमचा अभिमान स्वाभिमान सर्वकाही आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.गूगल भाषांतरासाठी ही कोकणी उपलब्ध - नुकतंच गुगलने भाषांतरासाठी कोकणी भाषेला स्थान उपलब्ध करून दिले आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी आपल्यासाठी ही गौरवाची बाब असून आपण नेहमीच ऋणी असल्याचा त्यांनी सांगितले.
Last Updated : May 14, 2022, 10:48 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details