नवी दिल्ली - गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मुख्यमंत्री सावंत यांनी गोव्याशी संबंधित विविध मुद्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यांशी चर्चा केली.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची दिल्लीत पंतप्रधान मोदींशी भेट - गोवा मुख्यमंत्री प्रमोद सावंत
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मुख्यमंत्री सावंत यांनी गोव्याशी संबंधित विविध मुद्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यांशी चर्चा केली.
मुख्यमंत्री कार्यालय सीएमओने या बैठकीबाबत सविस्तर माहिती दिलेली नाही. मुख्यमंत्री प्रमोद सावंत राज्य मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांच्या शिष्टमंडळासोबत दिल्ली दौऱ्यावर आहेत. बैठकीनंतर सावंत यांनी ट्वीट केले की, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज दिल्लीत भेट घेतली.
रविवारी मुख्यमंत्री सावंत, गोव्याचे उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवलेकर, विधानसभा अध्यक्ष राजेश पाटनेकर, राज्यसभा सदस्य विनय तेंदुलकर, राज्याचे समाज कल्याण मंत्री मिलिंद नाईक आणि सार्वजनिक बांधकांम मंत्री दीपक प्रभु पौस्कर यांच्या शिष्टमंडळाने धनगर समुदायाला अनुसूचित जमाती (एसटी) श्रेणीमध्ये सामील करण्याची मागणी करत केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा यांची भेट घेतली होती.