महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

गोवा : भाजपातील अंतर्गत बंडाळी चव्हाट्यावर.. दोन मंत्रीच डिजीटल मीटरवरून आमने-सामने - भाजपातील अंतर्गत बंडाळी

गोवा विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली असताना राज्यात भाजपचे मंत्री सध्या एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. डिजिटल मीटर बसविण्याच्या प्रक्रियेवरून वाहतूक मंत्री म्हाव्हीन गुडीन्हो आणि कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांनी परस्पर विरोधी खात्यावरच टीका करत भाजपातील अंतर्गत बंडाळी चव्हाट्यावर आणली आहे.

Goa BJP's internal dispute
Goa BJP's internal dispute

By

Published : Aug 13, 2021, 6:57 PM IST

Updated : Aug 13, 2021, 7:20 PM IST

पणजी -विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली असताना राज्यात भाजपचे मंत्री सध्या एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. डिजिटल मीटर बसविण्याच्या प्रक्रियेवरून वाहतूक मंत्री म्हाव्हीन गुडीन्हो आणि कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांनी परस्पर विरोधी खात्यावरच टीका करत भाजपातील अंतर्गत बंडाळी चव्हाट्यावर आणली आहे.

लोबो भाजपात नाराज -

कळनगुट चे आमदार मायकल लोबो त्याच्या मतदारसंघातून आगामी निवडणूक लढविणार असून आपल्या पत्नीला शिवोली मतदारसंघातून मैदानात उतरविणार आहेत. मात्र मागच्या महिन्यात राज्याच्या दौऱ्यावर असणाऱ्या राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पक्षात घराणेशाहीस थारा दिला जाणार नाही, असे सूचक वक्तव्य करून पक्षात एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला तिकीट दिले जाणार असल्याचे सूचक वक्तव्य करून लोबो यांना आधीच इशारा दिला आहे. म्हणून नाराज असणारे लोबो सध्या पक्षविरोधी वक्तव्य करून आपली नाराजगी व्यक्त करत आहेत.

भाजपातील अंतर्गत बंडाळी चव्हाट्यावर
कोविड महामारीमुळे टॅक्सीचालकांना मोफत मीटर बसवून द्यावे, अशी मागणी कलनगुटचे आमदार तथा राज्याचे कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांनी वाहतूक मंत्र्यांकडे केली होती. मात्र कोर्टाच्या आदेशानुसार आधीच मीटर बसविण्याची प्रक्रिया सुरू झाली असून आम्ही टॅक्सीचालकांना पहिल्यांदा पन्नास टक्के अनुदान देऊन ही प्रक्रिया सुरू केली आहे, असे वाहतूक मंत्री म्हाव्हीन गुडीन्हो यांनी सांगितले होते. मात्र याला लोबो यांनी आक्षेप घेत टॅक्सीचालकांकडून सुरुवातीलाच कोणतेही शुल्क न आकारता त्यांना सरसकट मोफतच मीटर बसवून द्यावे, अशी मागणीच त्यांनी लावून धरली होती. येथूनच दोघांत वितुष्ट निर्माण झाले.
लोबो यांनी आपल्या खात्याकडे लक्ष द्यावे- गुडीन्हो

मायकल लोबो यांनी मला शहाणपण न शिकविता आपल्या कचरा व्यवस्थापन खात्याकडे लक्ष द्यावे, अशी उपरोधिक टीका वाहतूक मंत्री म्हाव्हीन गुडीन्हो यांनी आमदार मायकल लोबो यांच्यावर केली होती.

म्हाव्हीन यांची एकाधिकारशाही - लोबो

म्हाव्हीन हे सर्व पक्ष फिरून भाजपात आले आहेत, त्यांची त्यांच्याच मतदारसंघात एकाधिकारशाही असून ही गोष्ट त्यांच्या वयाला शोभत नाही. मी माझ्या खात्याचे काम योग्यप्रकारे करत असून त्यानी टॅक्सीचालकांच्या हिताचा विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा, असा प्रतिटोला मायकल लोबो यांनी गुडीन्हो यांना लगावला.

Last Updated : Aug 13, 2021, 7:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details