गोवा :आपल्या खात्याने गोव्याला 15 हजार कोटींची मागणी असताना 22 हजार कोटी रुपये दिले. त्यामुळे गोव्याचा दुप्पट पटीने विकास झाला असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ( Minister Nitin Gadkari in Goa ) यांनी सांगितले. गोवा भाजपच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन गडकरी ( Bjp Office Inauguration In Goa ) यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
पर्रिकरांना मुख्यमंत्री करायला माझा मोठा वाटा
यावेळी माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या आठवणींना नितीन गडकरींनी ( Nitin Gadkari On Manohar Parrikar ) उजाळा दिला. ते म्हणाले की, "केंद्रात सुरक्षा मंत्री असताना मनोहर पर्रिकर यांनी गोव्यात पुन्हा परत जाण्याची इच्छा आपल्याकडे व्यक्त केली. त्यानूसार पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Pm Narendra Modi ) यांच्या मान्यतेने पुन्हा गोव्यात आले. 2017 साली सरकार स्थापन करत मुख्यमंत्री झाले. त्यात माझा मोठा वाटा होता."
काँग्रेस झोपले असताना आपण सरकार स्थापन केले