महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Global Climate Change : वाढत्या तापमानामुळे देशात दुष्काळ पडण्याची शक्याता - Global Climate Change

यूके स्थित युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट अँग्लिया ( University of East Anglia ) च्या अलीकडील संशोधनातून असे दिसून आले आहे की, जागतिक तापमानात ( Global temperature rise ) सतत होणाऱ्या वाढीमुळे जगातील अनेक देशांना दुष्काळाचा ( Possibility of drought ) सामना करावा लागणार आहे यात भारताचा देखील समावेश आहे. ( India may be more vulnerable to drought ).तापमानात 1.5 डिग्री सेल्सिअसची वाढ देखील भारत, चीन, इथिओपिया, घाना, ब्राझील, इजिप्त सारख्या देशांवर गंभीर परिणाम होऊ शकतात.

Global Climate Change
जागतिक तापमानवाढ

By

Published : Sep 29, 2022, 2:13 PM IST

नवी दिल्ली : जागतिक तापमानात सतत होणारी वाढ ( Global temperature rise ) केवळ भारतालाच नाही, तर जगभरातील परिसंस्थानाही मोठा धोका निर्माण करू शकतो ( India may be more vulnerable to drought ). यूकेस्थित युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट अँग्लियाच्या ( University of East Anglia ) नुकत्याच झालेल्या संशोधनात हा दावा करण्यात आला आहे. संशोधकांना असे आढळून आले आहे की, तापमानात 1.5 डिग्री सेल्सिअसची माफक वाढ देखील भारत, चीन, इथिओपिया, घाना, ब्राझील, इजिप्त सारख्या देशांवर गंभीर परिणाम ( Possibility of drought ) भोगावे लागू शकतात.

'जर्नल क्लायमॅटिक चेंज'च्या ( Journal Climatic Change ) नुकत्याच प्रकाशित झालेल्या अंकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. यात सहा देशांमध्ये तीव्र दुष्काळ ( Possibility of drought ) तसेच हवामान बदला विषयी निरिक्षण करण्यात आले आहे. संयुक्त अरब अमिराती ( UEA ) मधील जैवविविधता, हवामान बदलाचे सहयोगी प्राध्यापक जेफ प्राइस म्हणतात की "हवामान बदलाचा संशोधनात सहभागी असलेल्या सर्व देशांवर परिणाम होईल. या अंमलबजावणीनंतरही, तापमान, ग्लोबल वार्मिंग ( Global Warming ) तीन अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक राहण्याची शक्याता आहे.

एका निवेदनात त्यांनी म्हटले आहे की,"तापमानात तीन अंश सेल्सिअस वाढ झाल्यामुळे या प्रत्येक देशातील ५० टक्क्यांहून अधिक शेतजमीनीला पुढील ३० वर्षांत तीव्र दुष्काळाचा सामना करावा लागू शकतो. जे एका वर्षापेक्षा अधिक काळ राहू शकतो." लोकसंख्येचा अंदाजानुसार, संशोधकांनी अंदाज लावला की ब्राझील, चीन, इजिप्त, इथिओपिया, घाना या देशांतील 80 ते 100 टक्के लोकसंख्या या दुष्काळामुळे प्रभावित होऊ शकते. त्यांच्या मते, भारताच्या बाबतीत, असुरक्षित लोकसंख्येच्या अंदाजे 50 टक्के लोकसंख्येला एक वर्ष किंवा त्याहून अधिक काळ तीव्र दुष्काळाचा सामना करावा लागण्याची शक्याता आहे. संशोधकांनी असेही म्हटले आहे की, पॅरिस हवामान करारांतर्गत तापमान वाढ 1.5 अंश सेल्सिअसपर्यंत मर्यादित ठेवण्याचे उद्दिष्ट आहे.

संशोधकांच्या मते, जागतिक तापमानात 1.5 अंश सेल्सिअसची वाढ ब्राझील, चीनमध्ये तीव्र दुष्काळाचा धोका तिप्पट होईल, तर इथिओपिया, घानामध्ये दुप्पट होईल. त्याच वेळी, भारताच्या बाबतीत, त्यात किरकोळ वाढ होईल, तर इजिप्तच्या बाबतीत फारच कमी वाढ होईल. त्याचप्रमाणे, जागतिक तापमानात दोन अंश सेल्सिअस वाढ झाल्यास ब्राझील, चीनमध्ये तीव्र दुष्काळाचा धोका चौपट होईल, तर भारत, इथिओपिया, घानामध्ये ते दुप्पट होईल. तर हा दुष्काळ इजिप्तमध्ये 90 टक्क्यांहून अधिक असेल, असे संशोधकांनी सांगितले. जागतिक तापमानात तीन अंश सेल्सिअसने वाढ झाल्यास ब्राझील, चीनमध्ये दुष्काळाचा धोका 30 ते 40 टक्के, इथिओपिया, घानामध्ये 20 ते 23 टक्के, भारतात 14 टक्के, तर इजिप्तमध्ये दुष्काळाचा धोका जवळपास 100 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. संशोधकांच्या मते, ब्राझील, चीनमध्ये दुष्काळाचा धोका सुमारे 50 टक्के, इथिओपिया, घानामध्ये 27 ते 30 टक्के, भारतात 20 टक्के इजिप्तमध्ये जवळपास 100 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details