महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 27, 2023, 9:43 PM IST

ETV Bharat / bharat

9 Years Of Modi Govt : 'तुमच्या स्नेहामुळे मला आणखी काम करण्याची ताकद मिळते', मोदींनी मानले कौतुक करणाऱ्यांचे आभार

सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत त्यांच्या कार्यकाळाचे कौतुक करणाऱ्या लोकांचे आभार मानले आहेत. जनतेची आपुलकी त्यांना अधिक काम करण्याची ताकद देते, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

NARENDRA MODI
नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारला 9 वर्ष पूर्ण होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी त्यांच्या नऊ वर्षांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळाचे कौतुक करणाऱ्यांचे आभार मानले आहे. असा स्नेह मिळण्याने नेहमीच विनम्र वाटते आणि लोकांसाठी आणखी कष्ट करण्याचे बळ मिळते, असे ते म्हणाले.

पंतप्रधान मोदींचे ट्विट : पंतप्रधान मोदींनी ट्विट केले की, 'सकाळपासून मी #9YearsOfModiGovernment वर अनेक ट्विट पाहत आहे. या द्वारे लोक 2014 पासून आमच्या सरकारबद्दल कोण काय कौतुक करत आहेत त्यांना हायलाइट करत आहेत. अशी आपुलकी मला नेहमीच विनम्र बनवते आणि लोकांसाठी आणखी कष्ट करण्याची शक्ती देते.'

भाजपची देशभरात 50 रॅली आयोजित करण्याची योजना : नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाचे सरकार 30 मे रोजी आपल्या सलग दोन टर्मची नऊ वर्षे पूर्ण करणार आहे. सूत्रांनी सांगितले की, भाजपने 30 मे पासून महिनाभर देशभरात जनजागरण कार्यक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 30 मे ते 30 जून दरम्यान देशभरात सुमारे 50 रॅली आयोजित करण्याची भाजपची योजना आहे. यापैकी पंतप्रधान नरेंद्र मोदी अर्धा डझन रॅलींना संबोधित करतील. जवळपास वर्षभरानंतर होणाऱ्या असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीलाही या मोहिमेमुळे चालना मिळणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

अनेक नेते सहभागी होणार : 31 मे रोजी राजस्थानमधील अजमेर येथे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते मेगा रॅलीद्वारे या मोहिमेचे उद्घाटन होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. जनमोहिमेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि इतर अनेक नेते सहभागी होणार आहेत. नरेंद्र मोदी यांनी 26 मे 2014 रोजी पहिल्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. तर 30 मे 2019 रोजी त्यांनी दुसऱ्या टर्मसाठी शपथ घेतली होती.

हे ही वाचा :

  1. NITI Aayog Meeting : पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली आज नीती आयोगाची बैठक; एकनाथ शिंदे दिल्लीत, अनेक पक्षांचा बैठकीवर बहिष्कार
  2. CM Eknath Shinde: कोणी किती आले तरी मोदी एकटेच पुरेसे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विरोधकांवर टिका

ABOUT THE AUTHOR

...view details