महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Gita Gopinath On IMF : गीता गोपीनाथ बनणार आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या उपव्यवस्थापकीय संचालक

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने स्पष्ट केले आहे की, प्रथम व्यवस्थापकीय संचालक ( First Deputy Managing Director FDMD IMF ) जेफ्री ओकामोटो ( American Economist Geoffrey Okamoto) हे राजीनामा देणार आहेत. 21 जानेवारी 2022 पासून हे पद गीता गोपीनाथ ( Gita Gopinath IMF Dy Managing Director ) सांभाळणार आहेत. त्या तीन वर्षापासून येथे मुख्य अर्थशास्त्रज्ञ आणि संशोधन विभागाच्या संचालक या पदावर कार्यरत आहेत.

GITA GOPINATH
गीता गोपीनाथ

By

Published : Dec 3, 2021, 10:59 AM IST

Updated : Dec 3, 2021, 2:55 PM IST

वाॅशिंग्टन:आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (International Monetary Fund-IMF) चे प्रथम व्यवस्थापकीय संचालक (First Deputy Managing Director-FDMD) जेफ्री ओकामोटो (Geoffrey Okamoto) हे लवकरच राजीनामा देतील. त्यांची जागा सध्या मुख्य अर्थशास्त्रज्ञ या पदावर कार्यरत असलेल्या गीता गोपीनाथ घेतील. गीता 21 जानेवारी 2012 रोजी पद सांभाळतील. असे स्पष्ट करण्यात आले आहे.

तीन वर्षा पासून कार्यरत

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थशास्त्रज्ञ आणि संशोधन विभागाच्या संचालक गीता गोपीनाथ यांना जानेवारी 2022 मध्ये हार्वर्ड विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागात परतायचे होते. विद्यापीठाने त्यांची रजा अपवादात्मक परीस्थितीत एक वर्षाने वाढवली होती. त्यामुळे त्या तीन वर्षा पासून या पदावर कार्यरत होत्या. मात्र आता त्यांनी नाणेनिधीतच राहण्याचा निर्णय घेतला असून नव्यपदाची जवाबदारी त्या स्वीकारणार आहेत.

धोरणांचे नेतृत्व करतील
पहील्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्या निगरानी आणि संबंधित धोरणांचे नेतृत्व करतील, तसेच निधी प्रकाशनांचे संशोधन तसेच उच्च दर्जाच्या मानकांना प्रोत्साहन देण्यासाठी मदत करतील. गीता गोपीनाथ या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थशास्त्रज्ञ होण्यापुर्वी हार्वर्ड विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागात आंतरराष्ट्रीय अध्ययन आणि अर्थशास्त्राच्या प्राध्यापक होत्या.

Last Updated : Dec 3, 2021, 2:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details