गोरखपुर (उत्तर प्रदेश) Girl Sold by Friend : मैत्रिणीनं आपल्याचं मैत्रिणीला 63 हजार रुपयांना विकल्याचा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात उघडकीस आलाय. तरुणीसोबत कारमधून जात असताना लोकांनी तिला अडवलं. यानंतर चौकशी केल्यावर संपूर्ण प्रकरण उघडकीस आला. यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आलं आहे. याप्रकरणी दोघांनाही पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय.
चौघंजण पोलिसांच्या ताब्यात : मिळालेल्या माहितीनुसार, एक मुलगी तिची आई आणि लहान बहिणीसोबत भाड्याच्या खोलीत राहत होती. मंगळवारी संध्याकाळी काही तरुणांनी त्यांचं घर गाठलं आणि तिला जबरदस्तीनं कारमध्ये बसवून बरेलीला नेण्यास सुरुवात केली. यावेळी काही लोकांना संशय आल्यानं त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी मुलीला ताब्यात घेतलं. यानंतर दोन तरुणांसह चौघांना पोलिस ठाण्यात नेण्यात आलं.
नोकरीचं आमिष दाखवून विक्री : पिडित मुलीनं सांगितलं की, काही वर्षांपूर्वी तिच्या वडिलांचा तिच्या आईसोबत वाद झाला होता. यामुळं ती तिची आई आणि लहान बहिणीसोबत वेगळ्या घरात राहत होती. यादरम्यान ती नोकरीच्या शोधात होती. यावेळी तिची भेट प्रियांकाशी झाली. तिनं नोकरी देण्याचं आश्वासन दिलं. पीडितेला मंगळवारी प्रियंकानं फोन करत भेटाला ये नोकरी मिळेल असं सांगितलं. यानंतर संध्याकाळी परतत असताना प्रियांकानं एका गाडीकडे बोट दाखवून पीडितेला त्यात बसण्यास सांगितलं. हे लोक तुला घरी सोडतील असं तिला सांगितलं. त्यामुळं ती गाडीत बसली. वाटेत घराजवळ गाडी न थांबवल्यानं तिनं आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. यामुळं कारमध्ये बसलेल्या तीन तरुणांनी तिला धमक्या देण्यास सुरुवात केली. तिचा आवाज ऐकून लोकांनी तिथं येऊन पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलिसांनी सर्वांना पोलीस ठाण्यात नेलं.
पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल : सीओ कँट मानुस पारीक यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये बरेलीचा राजकुमार, धरमपाल, प्रशांत दीप आणि ड्रायव्हर सोनू यांचा समावेश आहे. राजकुमारनं आपला मित्र प्रशांत दीपशी लग्नासाठी संपर्क साधला होता. प्रशांत दीपनं हा प्रकार नातेवाईक सूरजला सांगितला. सूरजनं ही गोष्ट प्रियांकाला सांगितल्यावर तिने एक प्लॅन बनवला आणि मुलीला भेटायला बोलावलं. याठिकाणी मुलीचा 63 हजार रुपयांना व्यवहार करुन या लोकांच्या ताब्यात देण्यात आलं. याप्रकरणी चौघांची चौकशी करण्यात येत असून प्रमूख आरोपी सूरज आणि प्रियंकाचा शोध सुरू आहे. पीडितेच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे.
हेही वाचा :
- नागपुरातून अपहरण झालेल्या मुलाची मध्य प्रदेशमधून सुटका, मजूर जोडप्याला अटक होऊनही अपहरणाचे कारण गुलदस्त्यात!
- बालसुधार गृहातील अल्पवयीन आरोपीवर तिघांकडून लैंगिक अत्याचार; पुण्यातील घटनेनं खळबळ
- बिहारमध्ये एकतर्फी प्रेमातून रक्तरंजीत खेळ! छठपूजेवरून परतणाऱ्या 6 जणांवर गोळीबार, तिघांचा मृत्यू