चेन्नई: IIT मद्रास कॅम्पसमध्ये ( Sexual Assault incident in IIT Madras Campus ) 24 जुलैच्या मध्यरात्री एक विद्यार्थिनी सायकलने वसतिगृहात परतत होती. त्यावेळी एका अज्ञात व्यक्तीने तिला अडवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचे ( Girl sexually assaulted at IIT Madras ) त्यात म्हटले आहे. तिने मदतीसाठी आरडाओरडा केली: मात्र तिच्या हाकेला कोणीही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर ती मुलगी अत्याचार करणाऱ्या व्यक्तीशी भांडून घटनास्थळावरून पळून ( girl ran away after fighting with abuser ) गेली.
Sexual Assault to Girl in IIT Madras : IIT मद्रासमध्ये मुलीवर लैंगिक अत्याचार; पोलिसांकडून एक जण ताब्यात - IIT मद्रासमध्ये मुलीवर लैंगिक अत्याचार
IIT मद्रास कॅम्पसमध्ये ( Sexual Assault incident in IIT Madras Campus ) 24 जुलैच्या मध्यरात्री एका विद्यार्थिनीवर एका अज्ञात व्यक्तीकडून लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे ( Girl sexually assaulted at IIT Madras ) म्हटले आहे. त्यानंतर ती मुलगी अत्याचार करणाऱ्या व्यक्तीशी भांडून घटनास्थळावरून पळून गेली.
पीडित मुलगी जखमी -या घटनेत मुलगी जखमी झाली. याप्रकरणी पीडित मुलीच्या विद्यार्थीमित्राने या घटनेची तक्रार दिली होती. मैलापूर पोलिसांनी मुलीचा अधिक तपास केला. या प्रकरणी चेन्नईच्या सहाय्यक पोलिस आयुक्तांनी थेट आयआयटी कॅम्पसमध्ये जाऊन तपास केला. सध्या आयआयटी कॅम्पसमधील ज्यूसचे दुकान चालवणाऱ्या बिहारमधील संतकुमार (वय २४) नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. तसेच चेन्नईचे पोलीस आयुक्त शंकर जिवल यांनी अहवाल सादर करण्याचे आदेश जारी केले आहेत.