जोधपूर : राजस्थानच्या जोधपूरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तब्बल पाच वर्षांपासून तिघेजण आपल्यावर बलात्कार करत असल्याची तक्रार एका तरुणीने प्रतापनगर पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. आपल्या परिसरात राहणारे दोन सख्खे भाऊ आणि त्यांची आईही यात सामील होती होती, असा आरोप या तरुणीने केला आहे.
आईच्या मदतीने दोन सख्ख्या भावांसह मांत्रिकाचा तरुणीवर बलात्कार; तब्बल पाच वर्षांपासून सुरू होता प्रकार दोन सख्ख्या भावांसह मांत्रिकाने केला बलात्कार..
या तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार तिच्यावर तिघांनी वारंवार सामूहिक बलात्कार केला. यामध्ये दोन सख्खे भाऊ आणि एका मांत्रिकाचाही समावेश आहे. हा सर्व प्रकार तब्बल पाच वर्षांपासून सुरू होता. यादरम्यान ही मुलगी एकदा गर्भवतीही झाली. त्यानंतर या सर्वांनी तिचा गर्भपातही केला होता. यामध्ये सामील असलेल्या दोन भावांची आईदेखील त्यांची मदत करत होती, असा आरोप या तरुणीने केला आहे.
पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा ती १६ वर्षांची होती तेव्हापासूनच तिच्यावर अत्याचार करण्यास सुरू केले होते. हा प्रकार २०२१च्या एप्रिलपर्यंत सुरू होता. या तरुणीला धमकी देऊन तिचा मोबाईलही काढून घेण्यात आला होता.
पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल..
या प्रकरणाचा तपास करत असलेले पोलीस उपायुक्त लादूराम यांनी सांगितले, की या तरुणीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. तिच्या घराच्या परिसरात राहणाऱ्या लोकांनीच हे दुष्कृत्य केले आहे. पीडिता पाच वर्षांपूर्वी अल्पवयीन होती, त्यामुळे याप्रकरणी पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचेही लादूराम यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा :छत्तीसगड : अतिप्रमाणात अल्कोहल मिश्रित औषध पिल्याने ८ जणांचा मृत्यू