नवी दिल्ली : दिल्लीतील कांझावाला परिसरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री पाच मुलांनी स्कूटीवर बसलेल्या मुलीला ४ किलोमीटरपर्यंत ओढून नेले. (Girl on scooty dragged for 4 km). यामध्ये मुलीचा मृत्यू झाला असून तिचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. (girl body found naked in Delhi). सदर महिलेचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळल्याने हे प्रकरण अपघाताचे असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे, त्यामुळे पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा वेगवेगळ्या पैलूंवरून तपास करत आहेत. (Delhi Crime News).
मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला : बाह्य दिल्लीच्या डीसीपीनुसार, त्यांच्या टीमला पहाटे 3.53 वाजता माहिती मिळाली की बलेनो वाहनातून एक मृतदेह ओढला जात आहे. पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले आणि वाहनाची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, कांजवाला येथील रस्त्यावर एका मुलीचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. क्राईम टीमला घटनास्थळी पाचारण करून फॉरेन्सिक पुरावेही गोळा करण्यात आले. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी मंगोलपुरी येथील एसजीएम रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी कारचा शोध सुरू केला असता, कार सुलतानपुरी येथे बिघडलेल्या अवस्थेत आढळून आली. त्याचबरोबर पोलिसांना एक स्कूटीही मिळाली आहे. मुलीचे वय 20 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. ती खासगी कार्यक्रमांमध्ये स्वागत गर्ल म्हणून काम करायची. त्या रात्री पार्टीचे काम आटोपून ती घरी परतत होती.