लुधियाना - केंद्र सरकारसोबत चर्चेच्या फेऱ्या पार पडल्यानंतर कोणताही तोडगा अद्याप निघालेला नाही. त्यामुळे येत्या 26 जानेवारीला शेतकरी ट्रॅक्टर रॅली काढणार आहेत. सीमेवर ट्रॅक्टर रॅली काढण्यासाठी पंजाबमध्ये जोरदार तयारी जोरात सुरू आहे. राज्यातील विविध खेड्यातील प्रत्येकजण यासाठी हातभार लावत आहे. लुधियानामधील गिल मतदारसंघातील बुलारा गावातूनही ट्रॅक्टर परेडची तयारी पूर्ण झाली आहे. मनदीप कौर खालसा या स्वत: ट्रॅक्टर चालवत गावातून निघाणाऱ्या ट्रक्टर रॅलीचे नेतृत्व करणार आहेत.
आपल्या भावाने ट्रक्टर चालविण्याचे प्रशिक्षण दिले होते. हे आंदोलन पक्त शेतकर्यांचे नसून सर्वांचेच आहे, असे त्या म्हणाल्या. त्यांनी आंदोलन यशस्वी करण्यासाठी 26 जानेवरीला दिल्लीतील ट्रॅक्टर परेडमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.
गावातील अधिकाधिक तरूण आणि वडीलधाऱ्यांना गावातून ट्रॅक्टर परेडसाठी जमविले जात आहे. एक टीम गावातून दिल्लीकडे रवाना होईल, ज्यामध्ये सर्व भागातील लोक सहभागी होतील. उर्वरित राज्यांनी शेतकरी चळवळीत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.