नवी दिल्ली - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात रुग्णांचे बळी जात आहेत. ही संख्या एवढी आहे, की स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यासाठी जागाही शिल्लक राहत नाही. या कोरोनाच्या संकटात अनेक अतिशय दुर्दैवी व वेदनादायी घटना समोर येत आहेत. जगण्याची उमेद असलेल्या अनेकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. नुकतचं ऑक्सिजन सपोर्टवर असेल्या एका तरुणीचा 'लव्ह यू जिंदगी' या गाण्यावर थिरकतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. अखेर त्या तरुणीची मृत्यूशी सुरू असलेली झुंज आज अपयशी ठरली. रुग्णालयातील डॉ. मोनिका यांनी तीच्या मृत्यूची माहिती टि्वटद्वार दिली.
चार ते पाच दिवसांपूर्वी एका तरुणीचा 'लव्ह यू जिंदगी'या गाण्यावर थिरकतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये एक तरुणी बेडवर बसलेली असून ती ऑक्सिजन सपोर्टवर असल्याचे पाहायला मिळते. तर 'लव यू जिंदगी' या गाण्यावर ती ताल धरत होती. रुग्णालयातील डॉक्टरांनी तीचा व्हिडिओ सोशल माध्यमांवर शेअर केला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला होता. तर अनेकांनी तिच्या सकारत्मकतेचं भरभरून कौतुक केलं होतं. आयुष्यावर इतकं प्रेम करणाऱ्या तरुणीचा मृत्यू झाल्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.