डेहराडून (उत्तराखंड): उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या निवासस्थानातील सर्व्हंट क्वार्टरमध्ये गुरुवारी एका तरुणीने गळफास लावून आत्महत्या CM residence Girl suicide केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणी सुलेखा ही रुद्रप्रयाग जिल्ह्यातील रहिवासी होती आणि ती तिच्या दोन भावांसोबत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातील नोकर क्वार्टरमध्ये राहत होती आणि पोलिस परीक्षेची तयारी करत होती. Girl committed suicide in Servant Quarter
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीचा भाऊ मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बांधलेल्या गोशाळेत काम करतो. 2018 मध्ये, मुलीने 12वीची परीक्षा दिली होती आणि तेव्हापासून ती तिच्या भावासोबत डेहराडून येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या सर्व्हंट क्वार्टरमध्ये राहत होती.