महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Girl burnt alive in Bihar : बिहारमध्ये अज्ञातांनी तरुणीला भररस्त्यात पेटविले, मृत्यूनंतरही पीडितेची ओळख पटेना! - girl burnt alive in Bihar

सासाराममध्ये तरुणीला दिवसाढवळ्या रस्त्यावर जिवंत ( girl burnt alive in Bihar ) जाळण्यात आले. ती स्वत:ला वाचवण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा धावत राहिली. तिने लोकांना मदतीची याचना करत ( victim of girl in Bihar crime ) राहिली. पण कोणीही पुढे आले नाही. गंभीर जखमी मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, तिचा रुग्णालयात मृत्यू झाला.

Girl burnt alive
अज्ञातांनी तरुणीला भररस्त्यात पेटविले

By

Published : May 7, 2022, 5:47 PM IST

सासाराम - बिहारमधील महिलांच्या सुरक्षेचा ( woman safety in woman ) पुन्हा प्रश्न उपस्थित झाला आहे. सासाराममध्ये एका तरुणीला भरदिवसा रस्त्यात जिवंत जाळण्यात ( Girl burnt alive on road in Bihar ) आले. ही घटना गुरुवारी सासारामच्या मुफसिल पोलिस स्टेशन परिसरात ( Sasaram Mufassil Police Station ) असलेल्या मंडल कारा गेटजवळ घडली.

आगीच्या ज्वाळांनी वेढलेली तरुणी स्वत:ला वाचविण्याची विनंती करत रस्त्यावर धावत होती. कोणीतरी तरुणीला पेटविले होते. पण आग कोणी आणि का लावली? अखेर, मृत तरुणी कोण आहे, याबाबत कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.

अज्ञातांनी रस्त्यात तरुणीला पेटविले

पोलिसांना जबाब नोंदविता आला नाही- कारागृहाच्या शेजारील रस्त्यावरून आगीने पेटलेली तरुणी जुन्या जीटी रोडवर ( Girl burnt alive on road in Sasaram ) पोहोचली. रस्त्याच्या मधोमध ती लोकांना जीव वाचविण्यासाठी विनवणी करत होती. अचानक घडलेल्या या घटनेबाबत कोणालाच काही समजू शकले नाही. काही वेळाने स्थानिक लोकांनी मुलीच्या अंगावर ब्लँकेट टाकून आग विझविण्याचा प्रयत्न केला. या घटनेची पोलिसांना माहिती देण्यात आली. आगीत भाजलेल्या मुलीला रुग्णालयात आणण्यात आले. पोलिस तरुणीचा जबाब घेण्यासाठी तेथे पोहोचले होते. मात्र ,त्यापूर्वीच पीडितेचा मृत्यू झाला होता. त्यामुळे पीडितेचा जबाब नोंदविता आला नाही.

मृतदेहाची ओळख पटलेली नाही- तरुणीला वाहनातून बाहेर काढल्यानंतर कोणीतरी तिचा मृतदेह पेटवून दिला असावा, अशी शक्यता होत आहे. आता मृतदेहाच्या ओळख पटण्यासाठी संपूर्ण घटनेचा तपास सुरू आहे. पोलिसांनी शवविच्छेदन करून मृतदेह रुग्णालयात ठेवला आहे. मात्र, अद्याप मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी कोणीही पोहोचलेले नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असल्याचे एसएचओ राकेश कुमार यांनी सांगितले. मृतदेहाची ओळख पटल्यानंतरच गुन्हेगाराला शोधता येणार आहे. यासाठी सर्व पोलीस ठाण्यांमार्फत विविध पोलीस चौक्यांमध्ये माहिती देण्यात आली आहे. सासाराम सदर रुग्णालयाचे उपअधीक्षक डॉ. भगवान सिंह यांनी सांगितले की, तरुणीची ओळख पटविण्यात येण्यासाठी मृतदेह जतन करून ठेवण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details