महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Ghulam Nabi Azad : '2024 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस 300 जागांवर जिंकेल असे वाटत नाही'; गुलाम नबी आझाद यांचे विधान - Ghulam Nabi Azad on Lok Sabha Election 2024

जम्मू-काश्मीरमधील ( Jammu and Kashmir ) पुंछ येथे एका सभेला संबोधित करताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद ( Ghulam Nabi Azad ) यांनी लोकसभा निवडणुकासंदर्भात ( 2024 Lok Sabha Elections ) मोठे विधान केले आहे. सध्याच्या परिस्थितीवरून आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस (Indian National Congress) 300 जागा जिंकेल असे वाटत नाही, असे ते म्हणाले.

Ghulam Nabi Azad
गुलाम नबी आझाद

By

Published : Dec 2, 2021, 9:01 AM IST

Updated : Dec 2, 2021, 12:14 PM IST

श्रीनगर - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद ( Ghulam Nabi Azad ) यांनी लोकसभा निवडणुकासंदर्भात ( 2024 Lok Sabha Elections ) मोठे विधान केले आहे. सध्याच्या परिस्थितीवरून आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस (Indian National Congress ) 300 जागा जिंकेल असे वाटत नाही, असे ते म्हणाले. जम्मू-काश्मीरमधील ( Jammu and Kashmir ) पुंछ येथे एका सभेला संबोधित करताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. तसेच भाजपा सरकारने रद्द केलेले कलम 370 (Article 370 ) पुन्हा जम्मू काश्मीरमध्ये लागू करण्याचे आश्वासन देऊ शकत नसल्याचं त्यांनी म्हटलं.

भाजपाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने कलम 370 रद्द केले आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे ते परत लागू करणे शक्य नाही. सत्तेत आल्यावर पुन्हा ते लागू करेल, असे आश्वासन देणे खोटे ठरेल. लोकांना खूश करण्यासाठी जे हातात नाही, त्यावर मी बोलणार नाही. कारण, लोकसभेत बहुमत असलेले सरकारच कलम 370 हटवू शकते. सरकार स्थापन करण्यासाठी 300 खासदारांची गरज आहे. 2024 च्या निवडणुका जिंकून आमचे 300 नेते संसदेत पोहोचतील, असे मी वचन देऊ शकत नाही. 2024 मध्ये काँग्रेस 300 जागांवर जिंकेल असे वाटत नाही. मी तुम्हाला कोणतेही खोटे वचन देणार नाही. त्यामुळे मी कलम 370 हटवण्याबाबत बोलणार नाही, असे गुलाम नबी आझाद म्हणाले.

जम्मू-काश्मीचा राज्य दर्जा हिसकावून घेण्यात आला. जमीन आणि नोकऱ्या हिसकावण्यात आल्या आहेत. अशा स्थितीत मुख्यमंत्री होण्यात मला जास्त रस नाही. तर मला जम्मू काश्मीरच्या अस्मितेचे रक्षण, आणि तुमच्या नोकऱ्या आणि जमिनींवरील हक्क सुरक्षित करण्यासाठी काम करायचे आहे. आज मी फक्त तुम्हाला भेटण्यासाठी आणि तुमच्या समस्या जाणून घेण्यासाठी आलो आहे, असे गुलाम नबी आझाद म्हणाले.

Last Updated : Dec 2, 2021, 12:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details