महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

तारक मेहतामध्ये 'नटू काका' हे पात्र साकारणारे घनश्याम नायक यांचे निधन - Tarak Mehta show Natu Kaka news

तारक मेहता का उल्टा चश्मा या टीव्ही धारावाहिकेतील 'नटू काका' हे पात्र साकारणारे घनश्याम नायक यांचे निधन झाले आहे. ते 77 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते गळ्याच्या कर्करोगानेग्रस्त होते.

तारक मेहता का उल्टा चश्मा
तारक मेहता का उल्टा चश्मा

By

Published : Oct 3, 2021, 9:24 PM IST

Updated : Oct 4, 2021, 2:51 PM IST

हैदराबाद -तारक मेहता का उल्टा चश्मा या टीव्ही धारावाहिकेतील 'नटू काका' हे पात्र साकारणारे घनश्याम नायक यांचे निधन झाले आहे. ते 77 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते गळ्याच्या कर्करोगानेग्रस्त होते. मागील वर्षी त्यांचे ऑपरेशन देखील झाले होते. मात्र, त्यातून ते बरे होऊ शकले नाही. रविवारी मुंबईच्या मालाड परिसरातील सुचक रुग्णालयात त्यांनी आखेरचा श्वास घेतला.

हेही वाचा -मुलाला श्वास तर घेऊ द्या, तपासाच्या निकालाची वाट पाहा - सुनील शेट्टीची प्रतिक्रिया

घनश्याम नायक यांच्या मृत्यूनंतर तारक मेहता का उल्टा चश्मा शो चे प्रोड्यूसर असित कुमार मोदी यांनी ट्विटरवर आपल्या भावना व्यक्त केल्या. आमचे लाडके नटू काका आज आपल्यात नाही. परमेश्वर त्यांना आपल्या चरणांत स्थान देवो आणि त्यांना शांती देवो. त्यांच्या कुटुंबाला दुःख सहन करण्याची शक्ती देवो. नटू काका आम्ही तुम्हाला विसरू शकणार नाही, असे असित मोदी म्हणाले.

ट्विट

फनी एक्सप्रेशन्सने दर्शकांनाखूप हसवायचे

नटू काका हे पात्र साकारणाऱ्या घनश्याम नायक यांनी आपल्या कॉमेडीने दर्शकांना पोट दुखेपर्यंत हसवले. ते शोमध्ये जेठालालच्या असिस्टेंटचे पात्र साकारत होते. ते आपल्या फनी एक्सप्रेशन्सने दर्शकांना खूप हसवायचे. शोमधील नटू काका आणि बाघा या दोघांची जोडी खूप प्रसिद्ध होती. या दोघांनी दर्शकांना खूप हसवले. नटू काका यांची स्माईल आणि इंग्रजी बोलण्याची पद्धत दर्शकांना खूप आवडायची. त्यांनी आपल्या चाहत्यांचे भरपूर मनोरंजन केले. लोक त्यांना मिस करत होते, कारण काही दिवसांपासून ते शोमध्ये दिसले नाही. जून महिन्यात त्यांच्या आजाराची बातमी समोर आली होती.

..या चित्रपटांमध्ये केले काम

घनश्याम नायक यांनी आपल्या सहा दशकांच्या कारकिर्दीत अनेक संस्मरणीय पात्र साकारले आहेत. त्यांनी अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम केले, यात 'बेटा', 'लाडला', 'क्रांतिवीर', 'बरसात', 'घातक', 'चाइना गेट', 'हम दिल दे चुके सनम', 'लज्जा', 'तेरे नाम', 'खाकी' आणि 'चोरी चोरी' या चित्रपटांचा समावेश आहे.

हेही वाचा -भबानीपूर येथील पोट निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा दणदणीत विजय

Last Updated : Oct 4, 2021, 2:51 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details