नवी दिल्ली:भारताची अर्थव्यवस्था 2021-22 च्या चौथ्या तिमाहीत 4.1 टक्क्यांनी वाढली आहे, तर वार्षिक विकास दर 8.7 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. असे अधिकृत आकडेवारी वरुन दिसत आहे. तथापि, जानेवारी ते मार्च या कालावधीतील वाढ 2021-22 च्या मागील ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीतील 5.4 टक्के पेक्षा कमी आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 2020-21 च्या जानेवारी ते मार्च या कालावधीत सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) 2.5 टक्क्यांनी वाढले आहे.
जानेवारी ते मार्च या तिमाहीत जीडीपी 4.1 टक्याने वाढला; आर्थिक वर्ष 22 मध्ये 8.7 टक्के
2021-22 च्या चौथ्या तिमाहीत भारताची अर्थव्यवस्था (Indian GDP) 4.1 टक्क्यांनी वाढली (GDP grows), वार्षिक वाढीचा दर 8.7 टक्क्यांवर गेला, असे अधिकृत आकडेवारीने मंगळवारी दर्शविले.
भारताची अर्थव्यवस्था
आकडेवारीनुसार, 2020-21 मध्ये 6.6 टक्क्यांच्या आकुंचनाच्या तुलनेत 2021-22 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था 8.7 टक्क्यांनी विस्तारली आहे. NSO ने आपल्या दुसऱ्या आगाऊ अंदाजात 2021-22 मध्ये GDP वाढीचा अंदाज 8.9 टक्के ठेवला होता. 2022 च्या पहिल्या तीन महिन्यांत चीनने 4.8 टक्के आर्थिक वाढ नोंदवली होती.
हेही वाचा : बिटकॉइनने मार्चनंतरचा सर्वात मोठा नफा; $31,500 पेक्षा जास्त वाढवला