महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Jeet Adani Engagement : गौतम अदानींच्या मुलाचा साखरपुडा, जाणून घ्या कोण आहे अदानींची होणारी सून - जीत अदानी याचा साखरपुडा

उद्योगपती गौतम अदानी यांचा मुलगा जीत अदानी याचा साखरपुडा अहमदाबाद येथे पार पडला. जीत हे 2019 मध्ये अदानी समूहात सामील झाले होते. ते सध्या अदानी ग्रुप आणि फायनान्सचे उपाध्यक्ष आहेत.

Jeet Adani Engagement
गौतम अदानींच्या मुलाचा साखरपुडा

By

Published : Mar 15, 2023, 10:09 AM IST

नवी दिल्ली : उद्योगपती गौतम अदानी यांच्या घरी लवकरच शहनाई वाजणार आहे. गौतम अदानी यांचा धाकटा मुलगा जीत अदानी याचा रविवारी 12 मार्च रोजी दिवा जमीन शाहसोबत अत्यंत साध्या पद्धतीने साखरपुडा झाला. गुजरातमधील अहमदाबादमध्ये हा सोहळा पार पडला. या सोहळ्याला फक्त त्यांचे जवळचे मित्र आणि कुटुंबातील मोजके सदस्य उपस्थित होते.

कपलने परिधान केला पारंपारिक पोशाख : दिवा शाह ही सी. दिनेश अ‍ॅंड कंपनी प्रायवेट लिमिटेडचे हिरा व्यापारी जमीन शाह यांची मुलगी आहे. जीत आणि दिवा यांची एंगेजमेंट ही खाजगी बाब असल्याने या सोहळ्याबद्दल फारच कमी माहिती उपलब्ध करून देण्यात आली होती. जीत अदानी याच्या एंगेजमेंट सेरेमनीचे जे फोटो समोर आले आहेत, त्यात हे जोडपे अत्यंत सुंदर दिसत आहे. साखरपुड्यात दिवाने पारंपरिक पोशाख घातला होता. दुपट्ट्यासह पेस्टल ब्लू एम्ब्रॉयडरी लेहेंग्यात दिवा खूप सुंदर दिसत होती. तसेच पेस्टल एम्ब्रॉयडरी जॅकेटसह पेस्टल ब्लू कुर्ता सेटमध्ये जीत हा देखील अत्यंत सुंदर दिसत होता.

कोण आहे जीत अदानी ? : जीत अदानी यांनी अमेरिकेच्या युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनिया स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड अप्लाइड सायन्सेसमधून शिक्षण पूर्ण केले आहे. ते 2019 मध्ये अदानी समूहात सामील झाले होते. ते सध्या अदानी ग्रुप आणि फायनान्सचे उपाध्यक्ष आहेत. अदानी समूहाच्या वेबसाइटनुसार, जीत अदानी विमानतळ व्यवसाय तसेच अदानी डिजिटल लॅबचे देखील प्रमुख आहेत. गौतम अदानी यांना दोन मुले आहेत. त्यांचा मोठा मुलगा करण, जो अदानी पोर्ट्स आणि SEZ लिमिटेडचा मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आहे. त्याचा विवाह परिधी श्रॉफशी झाला आहे. परिधी ही सिरिल श्रॉफ यांची मुलगी आहे, जे सिरिल अमरचंद मंगलदास या लॉ फर्मचे व्यवस्थापकीय भागीदार आहेत.

हेही वाचा :Lokesh Kanagaraj's birthday : संजय दत्तने लिओ दिग्दर्शक लोकेश कनागराजच्या वाढदिवसानिमित्त लिहिली दिलखुलास चिठ्ठी

ABOUT THE AUTHOR

...view details