नवी दिल्ली- फोर्ब्सच्या अहवालानुसार, 59 वर्षीय गौतम अदानी यांंनी ( worlds fifth richest person ) संपत्तीत प्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरेन बफे ( warren Buffet wealth ) यांना मागे टाकले आहे. गौतम अदानी यांची संपत्ती अंदाजे 123.7 अब्ज डॉलर ( Adani Group Chairman Gautam Adani ) आहे. तर वॉरेन बफे यांची 121.7 अब्ज डॉलर संपत्ती आहे. ही आकडेवारी शुक्रवारी बाजार बंद झाल्याची आहे.
ब्लूमबर्ग बिलियनर्स निर्देशांकानुसार, २०२२ मध्ये उद्योगपती गौतम अदानी यांच्या संपत्तीमध्ये ४३ अब्ज डॉलर्सची ( Adani Group Chairman wealth ) भर पडली आहे. त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये ५६.२ टक्क्यांनी वाढली आहे. अदानी आता जगातील चार सर्वात श्रीमंत टायकून, मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स ( Bill Gates wealth ) (130.2 अब्ज डॉलर ), बर्नार्ड अर्नॉल्ट ( 167.9 अब्ज डॉलर ), जेफ बेझोस ( Jeff Bezos wealth ) ( 170.2 अब्ज डॉलर ) आणि एलोन मस्क ( Elon Musk wealth ) ( 269.7 अब्ज डॉलर ) यांच्या मागे आहेत. गौतम अदानी यांची अंदाजे एकूण संपत्ती 123.7 अब्ज डॉलर आहे. ते भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.
गौतम अदानी हे अदानी समुहाचे अध्यक्ष- गौतम अदानी हे अदानी समूहाचे अध्यक्ष आणि संस्थापक आहेत. ते विमानतळांपासून बंदरांपर्यंत आणि वीज निर्मितीपासून ते वितरणापर्यंत अनेक व्यवसायात आहेत. अदानी एंटरप्रायझेस, अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी पॉवर यासह त्यांच्या सहा सार्वजनिकरित्या व्यापार करणाऱ्या कंपन्या आहेत. अदानी समूहाने 08 एप्रिल रोजी जाहीर केले की अबुधाबीस्थित इंटरनॅशनल होल्डिंग कंपनीने PJSC (IHC) अदानीच्या तीन पोर्टफोलिओ कंपन्यांमध्ये - अदानी ग्रीन एनर्जी (AGEL), अदानी ट्रान्समिशन (ATL) आणि Adani Enterprises (AEL) मध्ये 2 अब्ज डॉलरहून अधिक गुंतवणूक केली आहे.