नवी दिल्ली : अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती ( gautam adani 2nd richest person in world ) बनले आहेत. जगातील टॉप-10 अब्जाधीशांच्या यादीत इलॉन मस्कनंतर ( Elon Musk is number one ) आता गौतम अदानी हे एकमेव आहेत. फोर्ब्स रिअल टाईम बिलियनेअर इंडेक्समध्ये गौतम अदानी यांनी बर्नार्ड अर्नॉल्टला मागे टाकत हे स्थान मिळवले आहे.
gautam adani now world 2nd richest person गौतम अदानी झाले जगातील क्रमांक दोनचे श्रीमंत व्यक्ती
जगातील टॉप-10 अब्जाधीशांच्या यादीत भारताचे गौतम अदानी दुसऱ्या क्रमांकावर ( gautam adani 2nd richest person in world ) पोहोचले आहेत. अदानी यांच्या पुढे आता फक्त एलॉन मस्क हेच आहेत. ( Elon Musk is number one )
फोर्ब्स रिअल टाईम बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, शुक्रवारी दुपारपर्यंत बिझनेस टायकून अदानी यांच्या संपत्तीत एकूण $5.5 बिलियनची वाढ झाली होती. आता ते १५५.७ अब्ज डॉलर्ससह जगातील नंबर दोनचे अब्जाधीश बनले आहेत. त्यांच्यापुढे आता केवळ एलॉन मस्क आहेत, ज्यांची एकूण संपत्ती $273.5 अब्ज आहे. अदानी नंतर, बर्नार्ड अर्नॉल्ट $ 155.2 अब्ज संपत्तीसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी या यादीत 92.6 बिलियन डॉलर्ससह आठव्या क्रमांकावर आहेत.
अदानी ही पहिल्या पिढीतील उद्योजकआहे आणि अदानी समूहामध्ये 7 सार्वजनिक सूचीबद्ध कंपन्यांचा समावेश आहे, ज्यात ऊर्जा, बंदरे आणि लॉजिस्टिक, खाण आणि संसाधने, गॅस, संरक्षण आणि एरोस्पेस आणि विमानतळ यांचा समावेश आहे. त्यांच्या प्रत्येक व्यवसाय विभागात, उद्योग समूहाने भारतात सर्वोच्च स्थान प्रस्थापित केले आहे. अदानी समूह हा भारतातील तिसरा सर्वात मोठा समूह (रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टाटा समूहानंतर) आहे.