न्यूयॉर्क- उद्योगपती गौतम अदानी ( Gautam Adani in Time magzine ) , करुणा नंदी ( Karuna Nundy ) आणि खुर्रम परवेझ ( Khurram Parvez ) यांना टाइम मासिकाने 2022 मधील 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये सोमवारी स्थान दिले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की ( Ukraine President Volodymyr Zelenskyy ) , रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन, टेनिस आयकॉन राफेल नदाल, ऍपलचे सीईओ टिम कुक आणि मीडिया मोगल ओप्रा विन्फ्रे यांचाही ( media mogul Oprah Winfrey ) या यादीत समावेश आहे.
टाईममधील अदानींच्या प्रोफाइलमध्ये ( Adanis profile in the Time ) म्हटले, की अदानी यांचा एकेकाळचा प्रादेशिक व्यवसाय आता विमानतळ, खाजगी बंदरे, सौर आणि औष्णिक उर्जा आणि ग्राहकोपयोगी वस्तूंनी व्यापलेला आहे. अदानी समूह आता जगातील सहाव्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेत राष्ट्रीय स्तरावर आहे. तरीही अदानी लोकांच्या नजरेतून दूर आहेत. शांतपणे त्याचे साम्राज्य निर्माण करत आहेत. गौतम अदानी हे अदानी समूहाचे अध्यक्ष आणि संस्थापक ( Gautam Adani founder of the Adani Group ) आहेत.
कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाशी संबंधित खटले-वकिल करुणा नंदी यांच्या ( Advocate Karuna Nundys profile ) प्रोफाईलमध्ये म्हटले, फक्त एक वकील नाही तर एक सार्वजनिक कार्यकर्तीदेखील आहेत. त्या बदल घडवून आणण्यासाठी न्यायालयाच्या आत आणि बाहेर दोन्ही बाजूंनी सक्षमपणे आणि धैर्याने काम करतात. नंदी या महिलांच्या हक्कांची चॅम्पियन आहेत. त्यांनी बलात्कार विरोधी कायद्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी वकिली केली आहे. कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाशी संबंधित खटले लढविले आहेत. अलीकडच्या काळात, करुणा नंदी भारताच्या बलात्कार कायद्यात वैवाहिक बलात्कारासाठी कायदेशीर सूट आहे. त्याविरोधात नंदी कायदेशीर खटला लढवित आहेत.