बुलंदशहर :सोमवारी जिल्ह्यातील डिबाई तहसीलच्या मागे असलेल्या शासकीय पॉलिटेक्निक कॉलेजच्या वसतिगृहाच्या किचनमध्ये सिलिंडरचा स्फोट ( Cylinder explosion in hostel kitchen ) झाला आहे. हा स्फोट झाल्याने मोठा धोका निर्माण झाला होता. या अपघातात पॉलिटेक्निकच्या 10 विद्यार्थ्यांसह 13 जण भाजले ( 13 people were burnt ) आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. सर्व विद्यार्थ्यांना वाचवण्यात आले असून त्यांना अलिगड उच्च वैद्यकीय केंद्रात ( Aligarh High Medical Center ) पाठवण्यात आले आहे.
Bulandshahr gas cylinder explosion : बुलंदशहरच्या पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट, 10 विद्यार्थ्यांसह 13 जण भाजले - UP Latest News
यूपीच्या बुलंदशहरमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट ( Gas cylinder explodes in Bulandshahr ) झाल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. पॉलिटेक्निक कॉलेजच्या किचनमध्ये हा अपघात झाला असून, त्यात 13 जण भाजले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी जेवण बनवत असताना वसतिगृहाच्या स्वयंपाकघरात अचानक 5 किलो गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या अपघातानंतर वसतिगृहात एकच गोंधळ उडाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी सर्व जखमींना रुग्णालयात दाखल केले. घटनास्थळी पोहोचून पोलीस अधिकारी तपासात गुंतले आहेत. विद्यार्थी त्रिदेवची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्हा दंडाधिकारी चंद्र प्रकाश सिंह ( District Magistrate Chandra Prakash Singh ) आणि डीआयजी संतोष कुमार सिंह घटनास्थळी रवाना झाले आहेत.
त्याचवेळी जिल्हा दंडाधिकारी चंद्र प्रकाश सिंह यांनी सांगितले की, या घटनेत दहा विद्यार्थी जखमी झाले आहेत. सर्व विद्यार्थ्यांना उपचारासाठी अलीगडला पाठवण्यात आले आहे. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे त्यांनी सांगितले.