नवी दिल्ली - देशामधील कोरोनाची परिस्थिती भयानक बनत चालली आहे. कोरोनाची नवीन रुग्णे विक्रमी पातळीवर नोंदविली जात आहेत. देशात लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. एका व्यक्तीला कोरोना लसीचे दोन डोस देण्यात येतात. कोव्हिशिल्ड लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या डोसमधील कालावधी वाढवण्यात आला आहे. हा कालावधी 12 ते 16 आठवड्यांनी वाढवण्यात आला आहे. सरकारच्या राष्ट्रीय लस सल्लागार समितीने दोन्ही डोसमधील अंतर वाढवण्याचा सिफारीश केली होती.
कोव्हिशिल्ड लसीच्या दोन्ही डोसमधील अंतर वाढवण्यात आले आहे. मात्र, कोव्हॅक्सिन लसीच्या दोन्ही डोसमधील अंतर वाढवण्यात आलेले नाही. सध्या कोव्हिशिल्ड लसीच्या दोन्ही डोसमधील अंतर चार ते आठ आठवडे असे आहे. ही शिफारस अशा वेळी करण्यात आली आहे, जेव्हा अनेक लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे.