महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Sidhu Moose Wala Murder Case : सिद्धू मूसेवाला हत्येप्रकरणी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या कोठडीत चार दिवसांची वाढ - लॉरेन्स बिश्नोई

पटियाला हाऊस कोर्टाने सिद्धू मूसेवाला हत्येप्रकरणी (Sidhu Moose Wala Murder Case) गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या (Gangster Lawrence Bishnoi) NIA कोठडीत चार दिवसांची वाढ केली आहे. यादरम्यान दर 24 तासांनी विश्नोई यांची वैद्यकीय तपासणी केली जाईल. यासोबतच त्याला दररोज त्याच्या वकिलाला भेटण्यासाठी 20 मिनिटे देण्यात येणार आहेत.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Dec 3, 2022, 4:39 PM IST

नवी दिल्ली :पंजाबी गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणात (Sidhu Moose Wala Murder Case) पटियाला हाऊस कोर्टाने गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या कोठडीत आणखी 4 दिवसांची वाढ केली आहे. (Gangster Lawrence Bishnoi custody). यापूर्वी 23 नोव्हेंबर रोजी एनआयएने लॉरेन्स बिश्नोईला पंजाबमधून रिमांडवर दिल्लीत आणले होते. एनआयएने 12 दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. त्यात बदल करून विशेष न्यायालयाने 10 दिवसांची कोठडी ग्राह्य केली आहे.

बिश्नोईला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर केले : गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला पटियाला हाऊस येथील विशेष न्यायाधीश शैलेंद्र मलिक यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. 10 दिवसांची कोठडी संपल्यानंतर एनआयएने बिश्नोईला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर केले होते. एजन्सीने आणखी पाच दिवसांची कोठडी मागितली होती, मात्र न्यायालयाने आणखी चार दिवसांचा रिमांड दिला आहे. रिमांडच्या काळातही दर 24 तासांनी बिश्नोईची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. यासोबतच त्याला दररोज त्याच्या वकिलाला भेटण्यासाठी 20 मिनिटे देण्यात येणार आहेत.

टोळी देशभरात दहशत पसरवण्याचे काम करते : एनआयएने न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, आरोपी देशभरात टार्गेट किलिंग करून दहशत पसरवण्याचे काम करत आहेत. याशिवाय देश-विदेशातील सिंडिकेटद्वारे कार्यरत असलेल्या या टोळ्यांचे काम निधी उभारणी आणि देशात दहशतवादी घटना घडवून आणण्याचे आहे. त्याचबरोबर ही टोळी दिल्ली आणि परिसरातील तरुणांची भरती करून देशातील प्रतिष्ठित लोकांच्या मनात दहशत पसरविण्याचे काम करत आहे. एनआयएच्या युक्तिवादाशी सहमती दर्शवत बिश्नोईच्या कोठडीत आणखी चार दिवसांची वाढ करण्यात आली.

दर 24 तासांनी वैद्यकीय तपासणी करावी : लॉरेन्स बिश्नोईचे वकील विशाल चोप्रा म्हणाले की, रिमांड वाढवताना न्यायालयाने एनआयएला लॉरेन्सच्या सुरक्षा व्यवस्थेची पूर्ण काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, आवश्यक असेल तेव्हाच त्याला न्यायालयात हजर करावे. याशिवाय दर 24 तासांनी त्यांची वैद्यकीय तपासणी करावी. चोप्रा यांनी सांगितले की, कोर्टाने त्यांना लॉरेन्सला भेटण्यासाठी दररोज 20 मिनिटे वेळ देण्याचे निर्देश दिले आहेत. बिश्नोईला जेव्हाही न्यायालयात आणले जाईल तेव्हा त्याचा चेहरा मास्कने झाकला जावा, असे न्यायालयाने सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details