नवी दिल्ली :कुख्यात गँगस्टर गोल्डी ब्रारने टिल्लू ताजपुरियाच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. असा दावा सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. 'भाऊ जितेंद्र गोगीच्या हत्येचा बदला घेतला आहे', असे फेसबुक पोस्टवर म्हटले आहे. गोल्डी ब्रार हा लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सहकारी आहे. हा तोच लॉरेन्स बिश्नोई आहे ज्यावर पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा आरोप आहे.
टिल्लू ताजपुरियाची हत्या योगेश टुंडा आणि दीपक तीतर यांनी केली : तिहार तुरुंगात गुंड टिल्लू ताजपुरियाच्या हत्येनंतर गोल्डी ब्रारने सोशल मीडियावर टाकलेली ही पोस्ट पोलीस आणि तुरुंग प्रशासनासाठी चिंतेचा विषय बनली आहे. जुन्या हत्येचा बदला घेण्यासाठी हे कृत्य केल्याचा दावा करण्यात आला आहे. तिहार तुरुंगातील टोळीयुद्ध आता थांबेल की नाही हे सांगणे सध्या कठीण आहे अशीही चर्चा आहे. दरम्यान, गोल्डी ब्रारच्या फेसबुक पोस्टवरून असा दावा करण्यात आला आहे की, 'टिल्लू ताजपुरियाची हत्या योगेश टुंडा आणि दीपक तीतर यांनी केली. टिल्लूने आमचा भाऊ जितेंद्र गोगीचा खून केला. आम्ही आता त्या हत्येचा बदला घेतला असही ते या पोस्टमध्ये मांडण्यात आले आहे.