महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Gangrape in Kanpur: नराधम मित्र.. डॉक्टरच्या मुलीवर मित्रांनीच केला बलात्कार, गुंगीचे औषध पाजून केले दुष्कृत्य.. - डॉक्टरच्या मुलीवर मित्रांनीच केला बलात्कार

उत्तरप्रदेशच्या कानपूरमध्ये डॉक्टरच्या मुलीवर तिच्याच मित्रांनी बलात्कार केला आहे. कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध पाजून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Gangrape in Kanpur gang rape with doctor's daughter, Scratched at many places of body, friends did cruelty
नराधम मित्र.. डॉक्टरच्या मुलीवर मित्रांनीच केला बलात्कार, गुंगीचे औषध पाजून केले दुष्कृत्य..

By

Published : Mar 5, 2023, 5:23 PM IST

कानपूर (उत्तरप्रदेश): जिल्ह्यातील बारा भागात शुक्रवारी एका डॉक्टरच्या मुलीवर तिच्याच मित्रांनी सामूहिक बलात्कार केला. एका इंस्टाग्राम मित्राने या मुलीला हुक्का बारमध्ये बोलावले. यावेळी कोल्ड्रिंकमध्ये औषधे मिसळून प्यायला देण्यात आली. यानंतर आरोपीने त्याच्या इतर मित्रांसह किशेरीला निर्जनस्थळी नेले. तिथे तिच्यावर गँगरेप करण्यात आला. तिने याला विरोध केल्यानंतर नराधमांनी अनेक ठिकाणी तिच्या शरीरावर चावे घेतले.

मुलगी कशीतरी आरोपींच्या तावडीतून सुटून घरी पोहोचली. तिने ही घटना तिच्या घरच्यांना सांगितली. तिच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारींवरून, बारा पोलिसांनी 3 नावाजलेल्या आणि 5 अनोळखी लोकांविरुद्ध बलात्कारासह इतर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पीडितेचे वडील हे एक डॉक्टर आहेत. त्यांनी सांगितले की, शुक्रवार, 3 मार्च रोजी, त्यांच्या 16 वर्षीय मुलीला बारा येथील रहिवासी विनय ठाकूर याने हुक्का बारमध्ये बोलावले होते.

हुक्का पिण्यास भाग पाडले:विनयने तिला हुक्का पिण्यास भाग पाडले. नकार देऊनही तिला हुक्का देण्यात आला. यानंतर कोल्ड्रिंकमध्ये मिसळलेली औषधे पिण्यासाठी देण्यात आली. मुलगी बेशुद्ध झाल्यावर विनयने त्याच्या इतर मित्रांसह तिला एका निर्जन ठिकाणी नेले. तिथे तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. मुलीने विरोध केल्यावर विनय आणि त्याचा साथीदार अजय, अमन यांच्याशिवाय इतर ४ ते ५ मुलांनीही तिला मारहाण केली.

अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी:नराधमांनी मुलीच्या गालाच्या खाली चेहऱ्यावर चावा घेतला. यामुळे तिच्या चेहऱ्यावर त्याचे व्रण राहिले आहेत. पीडितेच्या वडिलांनी सांगितले की, मुलगी कशीतरी नराधमांच्या तावडीतून सुटली आणि घरी पोहोचली. त्याचवेळी पीडितेने सांगितले की, आरोपी विनय ठाकूर तिला बऱ्याच दिवसांपासून ब्लॅकमेल करत होता. अश्लील व्हिडिओ बनवून ते व्हायरल करण्याची धमकीही आरोपी देत ​​आहेत.

आरोपींना पकडण्याचे प्रयत्न सुरु:डीसीपी दक्षिण सलमान ताज पाटील यांनी सांगितले की, मुलीच्या वडिलांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. विनय ठाकूर, अजय आणि अमन सिंग यांच्यासह 4 ते 5 अज्ञातांवर बलात्कार, प्राणघातक हल्ला, जीवे मारण्याची धमकी, ड्रग्ज देणे, दंगा करणे यासह अन्य गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना पकडण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा: Moodys Pakistan Ratings: पाकिस्तानला मोठा झटका.. मूडीजने पाच बँकांचे रेटिंग घटवले.. मोठा परिणाम होणार..

ABOUT THE AUTHOR

...view details